Tech News : आयफोनला टक्कर देणारा एखादा फोन कोणता? असं विचारलं असता, अनेकांचच उत्तर असतं Google Pixel 6. दमदार कॅमेरा, गुगलचं ऑथेंटीक सॉफ्टवेअर या आणि अशा अनेक कारणांसाठी मोबाईलप्रेमी आणि त्यातूनही तांत्रिक बाबींमध्ये रस असणारी मंडळी गुगलच्या पिक्सलला प्राधान्य देताना दिसतात, या फोनसाठी तगडी किंमतही मोजतात. पण, या महागड्या फोनमध्ये सध्या काही त्रुटी लक्षात येत असून, त्यामुळं युजर बरेच चिंतेतही दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Google Pixel 6 वापरणाऱ्यांना आता Android 15 च्या अपडेटनंतर काही गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत आहे. कारण, हा फोन सुरु असताना अचानकच बंद पडत आहे. साधारण आठवड्याभरापासून पिक्सल युजरना हे अपडेट उपलब्ध झाले असले तरीही मोबाईल सॉफ्टवेअर अपडेट झाल्यानंतर सुरळीत चालण्याऐवजी थेट बंदच पडत आहे. 


 Pixel 6 मध्ये अडचणी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा मोबाईल अपडेट करताना काही अडचणी येत होत्या. पण, सध्या होणारा गोंधळ युजरची परीक्षाच घेत आहे असं म्हणणं गैर नाही. त्यामुळं काही Techies च्या सांगण्यानुसार ज्यांच्याकडे गुगल पिक्सल 6 हा फोन आहे त्यांना तो अँड्रॉईड 15 वर अपडेट न करण्याचा सल्ला दिला जात आहे. 


फोन अचानक बंद होत असल्यामुळं एकतर तो खराब होण्याची शक्यता असण्यासोबतच त्यातील डेटासुद्धा करप्ट होण्याची भीती असल्यामुळं वरील सल्ला दिला जात आहे. Google कडून अद्यापही या समस्येवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. किंबहुना हे सत्र नेमकं कधी थांबेल याचीही माहिती देण्यात आलेली नाही, ज्यामुळं युजर चांगलेच पेचात पडल्याचं पाहायला मिळत आहे. 


हेसुद्धा वाचा : साप्ताहिक विशेष रेल्वेंमुळं प्रवाशांची मजाच मजा; नाशिक- इगतपुरी- परभणी सहज गाठता येणार, पाहा वेळापत्रक 


AndroidPolice च्या माहितीनुसार Android 15 च्या अपडेटनंतर गुगल पिक्सल 6 खराब का होतायत याची माहिती आणि यामागचं मुख्य कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण, प्राथमिक स्तरावर Private Space या फिचरमुळं हे सर्व होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ज्या युजरचे फोन खराब झाले आहेत त्यांच्या सांगण्यानुसार सध्या फोन पूर्णपणे बंद असून, ते दुरुस्तही होत नाहीयेत. गुगलच्याच Pixel 8 Pro युजरनाही काही समस्यांचा सामना करावा लागत असून, या फोनमध्ये बॅक जेस्चर काम करत नसल्याचं म्हटलं जात आहे.