Google Pixel वर 12 हजारांची घसघशीत सूट, 50MP कॅमेरा आणि 8GB रॅम; पहिल्यांदाच मिळतीये इतकी मोठी ऑफर
Google Pixel 7 खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये हा मोबाईल स्वस्तात मिळत आहे. या स्मार्टफोनवर तब्बल 12 हजारांची घसघशीत सूट जाहीर करण्यात आली आहे. या फोनमध्ये Google Tensor G2 प्रोसेसर, 50MP टा ड्युअल कॅमरा सेटअप आणि 8GB RAM मिळतो.
Flipkar Sale: फ्लिपकार्टवर सध्या Big Savings Day सेल सुरु आहे. हा सेल 9 ऑगस्टला संपणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनपासून ते लॅपटॉप, टीव्हीसहित अनेक वस्तूंवर जबरदस्त डिस्काऊंट जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, यामध्ये एक ऑफर अशी आहे जी पाहून तुम्ही स्वत:ला खरेदी करण्यापासून थांबवू शकणार नाही. याचं कारण या ऑफरमध्ये तुम्हाला तब्बल 12 हजार रुपये वाचवण्याची संधी मिळत आहे.
जर तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तुमच्याकडे चांगली संधी आहे. त्यातही जर Google Pixel 7 खरेदी करण्याची इच्छा असेल तर मग यापेक्षा चांगली वेळ नाही. याचं कारण फ्लिपकार्ट सेलमध्ये हा मोबाईल स्वस्तात मिळत आहे. या स्मार्टफोनवर तब्बल 12 हजारांची घसघशीत सूट जाहीर करण्यात आली आहे. या फोनची किंमत 59 हजार 999 रुपये आहे. पण फ्लिपकार्टवर तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 47 हजार 999 रुपयांत खरेदी करु शकता. या फोनमध्ये 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळतो.
जर तुम्ही Flipkar साईटवर गेलात तर तिथे हा Google Pixel 7 मोबाईल 47 हजार 999 रुपयांत उपलब्ध असल्याचं दिसेल. पण ही ऑफर एवढ्यावरच मर्यादित नाही. यामध्ये काही बँक ऑफर्सचाही समावेश आहे. ज्याचा वापर करत युजर्स अतिरिक्त 2 हजार रुपयांचा फायदा घेऊ शकतात. तसंच जुना फोन एक्स्चेंज केल्यास किंमत आणखीन कमी होते.
Google Pixel 7 मध्ये फिचर्स काय आहेत?
Google Pixel 7 मध्ये 6.3 इंचाचा Full HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये एक छोटा पंच होल कटआऊटही आहे, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा फिट करण्यात आली आहे. या हँडसेटमध्ये 4270mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये Google Tensor G2 प्रोसेसर फिट करण्यात आला आहे. जो तुम्हाला एक चांगला अनुभव देतो.
Google Pixel 7 मधील कॅमेरा सेटअप
Google Pixel 7 मधील कॅमेरा सेटअपबद्दल बोलायला गेल्यास, यामध्ये बॅक पॅनलवर ड्यूअल कॅमेरा सेटअप आहे. प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असून, सेकंडरी कॅमेरा 12 मेगापिक्सलचा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 10.8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.