नवी दिल्ली: आपण फोनमध्ये अनेक थर्डपार्टी अॅप्स वापरत असतो. ज्याची आपल्याला विशेष कल्पनाही नसते. ते अॅप किती सेफ आणि सिक्युअर आहेत मात्र बरेचदा आपण काहीही न वाचता सर्व पॉलिसी एक्सेप्ट करून ते अॅप वापरतो. मात्र सावधान असं केल्यानं तुमचा फोन हॅक होण्याचा धोका आहे. यासंदर्भात गुगलने मोबाईल अॅप संदर्भात एक अलर्ट जाहीर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे अॅप जर तुमच्या फोनमध्ये असतील तर आजच डिलीज करा. जर अजूनही तुम्ही घेतले नसतील तर या अॅप्सची नावं लक्षात ठेवा आणि चुकूनही कधीही आपल्या फोनमध्ये प्लेस्टोरवरून डाऊनलोड करू नका. 'झी न्यूज' इंग्लिशने दिलेल्या अहवालानुसार, डिजिटल सुरक्षेवर काम करणाऱ्या अवास्ट या कंपनीने आपल्या तपासात अशा 19,000 हून अधिक मोबाईल अॅप्स ओळखल्या आहेत. जे केवळ तुमचा वैयक्तिक डेटाच चोरू शकत नाही तर तुमच्या स्मार्टफोनची सुरक्षाही धोक्यात आणू शकतात.


अवास्ट कंपनीने केलेल्या तपासात जास्त मोबाईल अॅप्स चुकीच्या कॉन्फिग्रेशनची समस्या निर्माण करणारे आहेत. 19,300 अॅप्स युझर्सचा डेटा लिक करू शकतात. तसा धोका आहे. इतकच नाही तर हे अॅप डाऊलोड केले तर तुमच्या फोनच्या सुरक्षाही धोक्यात येऊ शकते. कंपनीच्या मते, अँड्रॉइड डेव्हलपर वापरकर्त्यांचा डेटा साठवण्यासाठी फायरबेस टूल्स वापरतात.


या कॉन्फिग्रेशनमुळे नाव गाव पत्ता आणि पासवर्डसह पर्सनल माहिती लीक होऊ शकते. त्यामुळे थर्डपार्टी अॅप किंवा असे काही अॅप जे सुरक्षेला धोका पोहोचवू शकतात ते डाऊनलोड करणं टाळावं असं आवाहन देण्यात आलं आहे. यामध्ये लाईफस्टाइल अॅप, गेमिंग अॅप, फूड डिलीव्हरी अॅप आणि ई-मेलशी संबंध अॅपचा समावेश आहे. 


कंपनीचे मालवेअर संशोधक Vladimir Martyanov म्हणाले की, अॅप्सवर असा ओपन डेटा उपलब्ध असणे धोकादायक आहे. त्यामुळे, वापरकर्त्यांचा वैयक्तिक आणि व्यावसायिक डेटा लीक होऊ शकतो. यामुळे त्याला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.