मुंबई : जर तुम्ही स्मार्टफोनमध्ये नवीन आणि खास पद्धतीने ऍप ठेवणं पसंत करता तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. काही लोकप्रिय ऍप जे लाखो-करोड लोकांच्या मोबाइलमध्ये आहेत ते तुम्हाला नुकसान देऊ शकतात. गुगलने नुकतंच Google Play Store वरून जवळपास 29 हून अधिक लोकप्रिय ऍप काढून टाकले आहेत. हे सारे ऍप असे आहेत ज्यांना लाखो-करोडो लोकांनी त्यांना डाऊन केले आहेत. 


या ऍपना लगेच करा अनइन्स्टॉल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलने दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही एंड्रॉयड स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्हाला Feel Camera HD, Filter Photo Frame, Lens Flares, Magic Effect, QR Code Scanner, Super Mark, Photo Effect Pro, Art Filter, Lie Detector prank, New Hair Fashion, Smart Magnifier Pro, Magnifier Pro- Magnifying glass, Magnifying Glass Pro, Cut Cut Mix, Cut Cut Mix Pro, Galaxy Overlay, Color Splash Photo Effect, Age Face, Photo Blur, Blur Image, Super Magnifier Lite, Magnifying Pro, Qing Camera, Reflex Camera HD, First Camera HD, Rhythm Camera, Pretty Makerup Photo, Glitch Lens - Vaporwave & Ghost Photo Editor, Multi Apps – Multiple Accounts simultaneously या ऍपना स्मार्टफोनमधून तात्काळ काढून टाकले पाहिजे. 


काढून टाकण्यामागचं हे कारण 


सायबर सिक्युरिटी आणि एँटी वायरस फर्म Quick Heal Security Labs यांनी सांगितलं आहे की, गुगलने जे 29 ऍप काढून टाकले आहेत. यातील 24 ऍप असे आहेत जे मॅलिसियस ऍप आहेत. म्हणजे युझर्सला नुकसान देणारे ऍप आहेत. हे ऍप HiddAd कॅटेगिरीमध्ये येतात. हे ऍप पहिल्यांदा स्मार्टफोनवर इन्स्टॉल होताना आपलं आयकॉन लपवतात. आणि स्क्रीनवर शॉर्टकट क्रिएट करतात. यामागचं कारण असतं युझर्स ऍपला फोनमधून काढून टाकणे. 


जेव्हा युझर्स शॉर्टकट मार्फत ऍप लाँच करतो. तेव्हा स्क्रीनवर फूल स्क्रीन जाहिरात दिसते. बाकी 5 ऍप हे असे आहेत जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे Youtube, Facebook सारख्या प्लॅटफॉर्मवर गेल्यावर इन्स्टॉल होतात. यामुळेच गुगलने या 29 ऍप्सना प्ले स्टोरवरून काढून टाकलं आहे.