Google Tricks : Google हे जगातील सर्वात जास्त पसंतीचे आणि सर्वाधिक वापरण्यात येणारे Search Engine आहे. भारतासह संपूर्ण जगात याचा सर्वाधिक वापर केला जातो. आज आम्‍ही तुम्‍हाला Google च्‍या अशाच ५ ट्रिक्स सांगणार आहोत. ज्या खूप मजेदार आणि नाविन्यपूर्ण आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांना याबद्दल माहिती असेल. पण, अनेकांना त्याबद्दल माहिती नसेलही . यापैकी एक ट्रिक इंटरनेट नसताना वेळ कसा काढायचा याबद्दल सांगते. इंटरनेट नसताना ऑफलाइन डायनासोर गेम येतो. जेव्हा इंटरनेट नसते तेव्हा ते आपोआप पेजवर येते .युजर्स क्लिक करून ते प्ले करू शकतात. पाहा अशाच काही ट्रिक्स.


Askew: शोध बारमध्ये "Askew" टाइप करा, एंटर दाबा आणि तुमचे पेज एका बाजूला झुकेल. पण काळजी करू नका, स्क्रीनमध्ये कोणतीही समस्या येणार नाही. फक्त मजकूर खाली झुकलेला दिसतो. तुम्ही नवीन पेजवर गेल्यावर ते फिक्स केले जाईल.


Google ऑर्बिट: Google ऑर्बिट टाइप करा आणि सर्च वर क्लिक करा. तुम्‍हाला मिळणारा पहिला Result "Google Sphere -मिस्टर डूब" हा असेल. त्यावर क्लिक केल्यानंतर होमपेज फिरू लागेल.


Flip A Coin: तुमच्याकडे नाणे नसल्यास आणि खेळण्यासाठी टॉसची आवश्यकता असल्यास, Google तुम्हाला मदत करेल. "Flip A Coin" टाइप करा आणि एंटर दाबा. हेड्स किंवा टेल... तुम्हाला पाहिजे असलेल्यावर क्लिक करा. हे अगदी टॉससारखे तुमचे काम सोपे करेल.


Roll A Dice: जेव्हा तुम्ही बोर्ड गेम खेळता तेव्हा तुम्ही फासे फिरवता. पण, जर तुमच्याकडे Dice नसतील तर Google ने यावरही पर्याय दिला आहे . फक्त "Roll A Dice" टाइप करा आणि तुम्हाला Virtual Dice मिळेल.