Google Gmail Update: भारतात बहुतांश लोक जीमेल वापरतात. गुगल काळानुरूप युजर्स फ्रेंडली विचार करत आपल्या प्रोडक्समध्ये बदल करत असते. या दृष्टीकोनातून गुगलने काही बाबी अपडेट केल्या आहेत. गुगल फोटो आणि जीमेलमध्ये बदल केले आहेत. जीमेलनं गेल्या 18 वर्षात डिझाइन अपग्रेड केलं आहे. जीमेलचा हा बदल गुगल वर्कस्पेससोबत सर्व वापरकर्त्यांसाठी असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टद्वारे जीमेलच्या रीडिझाइन केलेल्या यूजर इंटरफेसचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच, त्याच्या युनिफाइड मॉडर्न डिझाइनचे तपशील शेअर केले आहेत. आता युजरला जीमेलमध्ये मेलबॉक्ससोबतच चॅट, स्पेस, मीट हे सर्व फीचर्स मिळणार आहेत. म्हणजेच युजर्स एकाच ठिकाणाहून अनेक प्रकारची कामे करू शकणार आहे. जीमेलची नवीन डिझाईन गेल्या काही महिन्यांपासून पब्लिक प्रीव्ह्यूसाठी उपलब्ध होती. सूचनांनुसार जीमेल काही बदल केले आहेत. यामध्ये जीमेलच्या मुख्य विंडोच्या डाव्या बाजूला चॅट्स, स्पेस आणि मीट पाहता येतील. युजर्स या अ‍ॅप्समध्ये सहजपणे स्विच करू शकतील. त्यांना वेगळ्या विंडोमध्ये जाण्याची गरज नाही.



येत्या काही दिवसात युजर्सना हे अपडेट मिळणार आहे. गुगलने डेस्कटॉप तसेच अँड्रॉईड आणि आयओएसाठी हे अपडेट केले आहे. गुगलच्या ब्लॉग पोस्टनुसार, यूजर्सना स्मार्टफोन आणि वेब व्हर्जन्समध्ये स्मार्ट कंपोज तसेच स्मार्ट रिप्लाय फीचर मिळेल. जीमेलच्या डिझाइनमध्ये, युजर्संना कस्टम इनबॉक्स थीम, AI आधारित स्पॅम, फिशिंग, मालवेअर संरक्षण यांसारखी वैशिष्ट्ये देखील मिळतील. 


दुसरीकडे, जर एखाद्या वापरकर्त्याला जीमेलची जुनी विंडो वापरायची असेल, तर ते सेटिंग्जमध्ये जाऊन वापरू शकतील. याशिवाय, गुगल जीमेलच्या आणखी काही नवीन वैशिष्ट्यांवर काम करत आहे. यामध्ये सर्च रिझल्ट अपग्रेड करण्यापासून ते इमोजी डिझाइन करण्यावर भर दिला जाणार आहे. टॅब्लेटसाठी जीमेलच्या डिझाइनमध्ये येत्या काही दिवसांत सुधारणा केली जाण्याची शक्यता आहे.