मुंबई: रिलायन्स जिओ बाजारात दाखल झाल्यापासून दूरसंचार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जिओ दूरसंचार कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमी बाजारात नवीन योजना सादर केल्या आहेत. त्यामुळे बाजारात असलेल्या इतर दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या योजनेत बदल करावा लागतो आहे. यावेळी सर्व दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या वार्षिक योजनेत बदल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


रिलायन्स जिओची वार्षिक योजना 



रिलायन्स जिओची १ हजार ६९९ रुपयाची वार्षिक योजना आहे. वार्षिक योजने अंतर्गत ग्राहकांना प्रतिदिन १.५ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंग सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रतिदिन १०० एसएमएस मिळणार आहेत. या योजनेचा कालावधी ३६५ दिवस असणार आहे. २४ तासांच्या आत १.५ जीबी डेटा समाप्त झाल्यास इंटरनेट स्पीड ६४ केबीपीएस होणार आहे.


 


व्होडाफोनची वार्षिक योजना



व्होडाफोन कंपनीने १ हजार ४९९ रुपयांची वार्षिक योजना ग्राहकांसाठी आणली आहे. योजनेत ग्राहकांना प्रतिदिन १ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. तसेच या योजनेत ग्राहकांना अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंग देण्यात आले आहे. 


 


बीएसएनएलची वार्षिक योजना 



भारतीय संचार निगम लिमिटेडची वार्षिक योजना १ हजार ६९९ रुपयांची आहे. यामध्ये ग्राहकांना प्रतिदिन १.४ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळणार आहे. या योजनेची कालावधी ३६५ दिवसांचा असणार आहे.