नवी दिल्ली - प्रदूषणाच्या प्रमाण कमी करण्यासाठी, त्याचबरोबर पेट्रोलच्या चिंतेपासून दूर ठेवण्यासाठी हिरो कंपनीने नवीन इलेक्ट्रॉनिक सायकल लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रॉनिक सायकलमुळे अनेकांना मोठी मदत होणार आहे. ही सायकल विजेच्या साह्याने तसेच पायानेही चालवता येणार आहे. सायकलच्या मदतीने पैसे वाचवता येणार सोबत आरोग्याची काळजी राखता येणार आहे. तर पाहूया, इलेक्ट्रिक सायकलचे फिचर आणि किंमत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इलेक्ट्रिक सायकलचे फिचर आणि किंमत


इलेक्ट्रिक सायकलचे नाव लेक्ट्रो इ झेड एफियर (Lectro EZephyr) आहे. यामध्ये बॅटरीसह पॅडलचाही समावेश करण्यात आला आहे. सायकलची बॅटरी संपल्यावर पॅडलच्या मदतीने सायकल चालवता येणार आहे. हिरोच्या इलेक्ट्रिक सायकलची किंमत २६ हजार ९९९ रुपये आहे. ऑनलाइन स्टोअर्स किंवा रिटेलर्सकडून या सायकलची खरेदी करु शकता. हिरो सायकल कंपनीचा दावा आहे की, एकदा चार्ज केल्यावर ही सायकल ३५ किलोमीटरपर्यंत धावणार आहे. लेक्ट्रो इ झेड एफियरमध्ये ३६ v/२५०w ची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी पूर्ण चार्ज करण्यासाठी ३.४ तासाचा कालावधी लागणार आहे. सायकलमध्ये ७ स्पीड गिअर असणार आहेत. यात दिलेल्या वॉक मोड (walk mode) ऍक्टिव्ह केल्यावर सायकल प्रतिताशी ६ किलोमीटरपर्यंत धावणार आहे. सायकलमध्ये इलेक्ट्रिक एलइडी देण्यात आली आहे. त्याचबरोबर सायकलमध्ये इलेक्ट्रिक ट्यूबची चाके लावण्यात आली आहेत.