Hero MotoCorp E-Scooter : पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel) सततच्या वाढत्या महागाईला सर्वसामान्य माणस हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत महागाईपासून दिलासा मिळावा म्हणून लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे (electric vehicles) वळू लागले आहेत. अशातच आज (7 ऑक्टोबर) Hero MotoCorp देखील आपली पहिली ई-स्कूटर लॉन्च (Launch) करणार आहे. कंपनी आपल्या ई-मोबिलिटी ब्रँड Vida अंतर्गत ही ई-स्कूटर लॉन्च करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा दावा केला जात आहे की लॉन्च करण्यापूर्वी या स्कूटरची चाचणी सुमारे 2 लाख किमी चालवून केली गेली आहे. जेणेकरून ग्राहकांना खरेदी केल्यानंतर कोणतीही अडचण येऊ नये.


ई-स्कूटरची वैशिष्ट्ये 


कंपनीने अद्याप या ई-स्कूटरची माहिती जाहीर केलेली नाही. पण मीडियामध्ये आलेल्या माहितीनुसार या स्कूटरमध्ये बसवण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक मोटर 3kW चा पीक पॉवर आणि 115Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. असे सांगितले जात आहे की एकदा चार्ज केल्यानंतर ही ई-स्कूटर सुमारे 25 किमी नॉन-स्टॉप चालवता येते.


ग्राहकांना बॅटरी स्वॅप करण्याची सुविधा मिळणार आहे


मिळालेल्या माहितीनुसार, Hero MotoCorp चे E-Scooter बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानासह येईल. यासाठी कंपनीने तैवानस्थित गोगोरोसोबत भागीदारी केली आहे. ही कंपनी बॅटरी उत्पादन आणि स्वॅपिंग तंत्रज्ञानामध्ये तज्ञ मानली जाते. या तंत्रज्ञानाअंतर्गत यूजर्स स्कूटरची बॅटरी स्वतः बदलू शकणार आहेत.


देशातील चार्जिंग स्टेशन वाढवण्यासाठी हिरो कंपनीने बीपीसीएलसोबत भागीदारी केली आहे. दोन्ही कंपन्या मिळून बंगळुरू, दिल्लीसह देशातील 7 शहरांमध्ये चार्जिंग स्टेशनची पायाभूत सुविधा तयार करतील.


स्कूटरची किंमत खूप जास्त असू शकते


हीरो कंपनीच्या या पहिल्या ई-स्कूटरमध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट, एलईडी लॅम्प, स्मार्ट सेन्सर, फिक्स्ड सेटअप बार, सिंक्रोनाइझ ब्रेकिंग सिस्टीम, हायड्रॉलिक डिस्क ब्रेक यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये पाहता येतील.


कंपनीने या पहिल्या ई-स्कूटरची किंमत जाहीर केलेली नाही. असे मानले जात असले तरी या स्कूटरची किंमत 80 हजार ते एक लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. बाजारात दाखल झाल्यानंतर ही ई-स्कूटर बजाज चेतक, ओला एस१, ओकिनावा आणि टीव्हीएस आयक्यूबशी स्पर्धा करेल.