मुंबई :  सर्व हिरो स्प्लेंडर मॉडेल्सच्या किंमती वाढल्या आहेत. हिरो मोटोकॉर्पने त्याच्या सर्व Hero Splendor मॉडलच्या किंमती वाढवल्या आहेत. मोटोकॉर्पची ही बाईक 100 सीसी इंजिन सेगमेंटच्या बाजारात जबरदस्त पकड ठेवते आणि देशातील सर्वात जास्त विकली जाणारी मोटारसायकल आहे. हिरो मोटोकॉर्पने आधीच जाहीर केले आहे की ते आपल्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या किंमतीत 3 हजार रुपयांपर्यंत वाढ करेल. याचे कारण म्हणजे कच्च्या मालाच्या आणि इतर वस्तूंच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ, त्यातील काही भार कंपनीने आपल्या ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे.


स्प्लेंडरची नवीन यादी येथे आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने 20 सप्टेंबरपासून हिरो स्प्लेंडरच्या वाढलेल्या किंमती लागू केल्या आहेत. दिल्लीतील एक्स-शोरूम किंमतीनुसार त्याचे मॉडेल 1 हजार ते 1 हजार 700 रुपयांपर्यंत महाग झाले आहेत.
- Splendor iSmart Drum/Alloy 68 हजार 650रुपयांऐवजी 69 हजार 650 रुपये,
- Splendor Plus Self/Drum/Alloy 66 हजार 050 रुपयांऐवजी 67 हजार 160 रुपये,
- Splendor Plus Self/Drum/Alloy/i3S 67,210 रुपयांऐवजी 68,360 रुपये,
- Splendor Plus Black and Accent Self/Drum/Alloy 67,260 रुपयांऐवजी 68,860 रुपये
- Super Splendor Drum/Alloy 72 हजार 600 रुपयांऐव 73 हजार 900 रुपये आणि
-Super Splendor Disc/Alloym 5 हजार 900 ऐवजी 77 हजार 600 रुपये आहे.


या मॉडेल्सची किंमत वाढली नाही


हिरो स्प्लेंडरच्या काही मॉडेल्सच्या किंमती वाढल्या नाहीत. यामध्ये स्प्लेंडर आयस्मार्टचा समावेश आहे. डिस्क / ऍलॉय पूर्वीप्रमाणे 72 हजार 350 रुपये, स्प्लेंडर प्लस किक/ड्रम/अलॉय
64 हजार 850 आणि स्प्लेंडर प्लस 100 मिलियन एडिशनची किंमत 70 हजार 710 रुपये आहे.