मुंबई : भारतातलं हिरो स्प्लेंडर या दुचाकीचं वर्चस्व संपलं आहे. होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर इंडियाच्या (एचएमएसआय) ऍक्टिव्हा स्कुटीची विक्री २ कोटींच्या वरती गेली आहे. याचबरोबर ऍक्टिव्हा देशातली सर्वाधिक विक्री झालेली दुचाकी बनली आहे. ऍक्टिव्हानं हिरो मोटोकॉर्पच्या स्प्लेंडरला मागे टाकलं आहे. याचबरोबर ऍक्टिव्हा जगभरात सर्वाधिक विक्री होणारी दुचाकीही बनली आहे. आम्ही बुधवारी ऍक्टिव्हाच्या २ कोटी विक्रीचा आकडा गाठल्याचं कंपनीनं सांगितलं.


१५ वर्षात १ कोटी विक्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ कोटी दुचाकींची विक्री करण्यासाठी कंपनीला १५ वर्ष लागली. तर दुसऱ्या १ कोटीची विक्री फक्त ३ वर्षांमध्येच झाली. लागोपाठ १८ वर्ष वाहनाला सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केल्याचं हे यश असल्याचं एचएमएसआयचे अध्यक्ष मिनोरु कातू यांनी सांगितलं. ऍक्टिव्हाचे आत्तापर्यंत ५ व्हर्जन बाजारात आले होते.


ऑटो एक्सपोमध्ये आलं नवं व्हर्जन


ऑटो एक्सपो २०१८ मध्ये होंडा ऍक्टिव्हाचं नवीन व्हर्जन ऍक्टिव्हा 5G आलं होतं. स्कूटरला दोन व्हर्जन viz STD आणि DLX मध्ये सादर करण्यात आलं. viz STD ची किंमत ५२,४६० रुपये आणि DLX ची किंमत ५४,३२५ रुपये आहे. कंपनीनं या स्कूटरमध्ये अनेक फिचर जोडले. त्यामुळे विक्री वाढली. नवीन होंडा ऍक्टिव्हा 5G मध्ये एलईडी हेडलॅम्प देण्यात आले.


ऍक्टिव्हा 5Gला डिजीटल ऍनलॉग इंन्स्ट्रूमेंट क्लस्टर, सर्व्हिस रिमाइंडर इंडिकेटर, ४ इन १ लॉक सिस्टिम, मोबाईल पॉकेट देण्यात आलं. स्मार्ट बटण एकदा दाबल्यामुळे सीट खाली असलेलं सामान उघडायला मदत होते. ऍक्टिव्हा 5Gला १०९.१९ सीसीचं इंजिन देण्यात आलंय.