Honda ची नवी SUV लाँच; फोटो- फिचर्स पाहूनच कारच्या प्रेमात पडाल
Honda Elevate SUV : नवी कार घ्यायच्या विचारात असाल, तर एक Solid पर्याय तुमच्या यादीत आताच Add करा. डील ठरवण्याआधी हा पर्यायही पाहाच.
Honda Elevate SUV : भारतीय ऑटो जगतामध्ये काही नवनवीन कार गेल्या बऱ्याच दिवसांमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. यामध्ये एसयुवींना मिळणारी ग्राहकांची पसंतीही वाखाणण्याजोगी आहे. मुळात ग्राहकांची मिळकत आणि त्यानुसार कार खरेदीला प्राधान्य देण्याची त्यांची वृत्ती या गोष्टी एकंदरच Auto Sector मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तुम्हीही या कारप्रेमींपैकीच आहात का?
येत्या काळात तुम्हीही मिडसाईज आणि मिडरेंज एसयुवीच्या प्रेमात असाल, तर होंडाची नवी SUV तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. कारण, आता Honda नं नव्या एसयुवीसह त्यांच्या कार पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. जिथं, होंडाच्या सिटी आणि अमेजनंतर आलेल्या या कंपनीचं हे प्रोडक्ट चांगलंच चर्चेत आलं आहे.
नव्या Honda Elevate SUV ची किंमत काय?
अधिकृतरित्या सर्वांसमोर आलेली होंडा इलेवेट ऑगस्ट अखेरीस भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. तेव्हाच या कारची खरी किंमत समोर येईल. तूर्तास सध्या जाणकारांच्या मते या कारची किंमत 10 ते 18 लाखांच्या दरम्यान असू शकते.
हेसुद्धा वाचा : WTC Final 2023 : सर डॉन ब्रॅडमन यांचा 'विराट' विक्रम मोडण्यासाठी कोहली सज्ज, पाहा काय आहे Record
भारतीय कार जगतामध्ये लाँच झाल्यानंतर या कारला ह्युंडई क्रेटा, किआ सेल्टोस, मारुती सुझुकी ग्रँड वितारा या आणि अशा इतर काही कारचं आव्हान असेल. त्यामुळं आता फिचर्सच्या बळावर ही कार दणदणीत नफा कमवते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
कारचे फिचर पाहूनच घ्या...
स्ट्राँग हायब्रिड तंत्रासोबत या कारमध्ये 1.5 लीटर एटकिंसन सायकल पेट्रोल इंजिनचा पर्याय उपलब्ध असेल. या कारमध्ये सध्या 1.5-लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असून ते 212 बीएचपी पॉवर जनरेट करेल. कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि सीवीटीही आहे.
कारमध्ये लेवल-2 ADAS (एडवांस्ड ड्राइवर असिस्टेंस सिस्टम्स), कनेक्टेड कार फंक्शनलिटी आणि 10 इंचांचं टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टीम देण्यात आलं आहे. शिवाय त्यामध्ये एबीएस, सहा एअरबॅग्स, हिल होल्ड असिस्ट, रियर सीटबेल्ट रिमाइंडर असे फिचर्स देण्यात आले आहेत.