Hondaची नवीन बाइक लॉन्च; जाणून घ्या फिचर्स
जाणून घ्या फिचर्स
नवी दिल्ली : होंडाने (Honda) भारतीय बाजारात 'सीबी शाइन एसपी १२५ बीएस ६' लॉन्च केली आहे. ही बाईक खासकरुन तरुणांसाठी बनवण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. या बाइकची किंमत ७२ हजार ९०० रुपये इतकी आहे. ग्राहकांना एसपी १२५ बाइक, ड्रम आणि डिस्क या दोन वेरिएन्टमध्ये उपलब्ध असणार आहे. या बाइकची डिलिव्हरी दोन आठवड्यांनंतर सुरु करण्यात येणार आहे. बाइक पूर्ण डिजिटल मीटरसह सज्ज असणार आहे.
हे मीटर इंधनाची माहिती, ईसीओ इंडिकेटर, गियर पोजिशन इंडिकेटर, सर्व्हिस ड्यू इंडिकेटर आणि ट्रिप, क्लॉक, ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक लाइटसारख्या इतर माहितीचा तपशील दाखवते.
Honda SP 125 BS6 सीसी मध्ये अपडेटेड 124.73cc, एअर-कूल्ड, सिंगल-सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 10.88hp पॉवर देईल. जे सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त आहे.
याशिवाय फ्यूल इंजेक्शनची सुविधाही देण्यात आली आहे. बाइकला ५ स्पीड गिअरबॉक्स मिळेल. कंपनीने Sp125 साठी १९ नवीन पेटंट अर्ज दाखल केले आहेत.