नवी दिल्ली : प्रमुख वाहन निर्माता कंपनी होंडा कार्स इंडियाने भारतात आपली होंडा City, Amaze आणि WR-V या कारचं स्पेशल एडिशन लॉन्च केलं आहे. या तिन्ही कार्सच्या स्पेशल एडिशनला नावही स्पेशल देण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होंडाच्या City, Amaze आणि WR-V या कार्सला क्रमश:  होंडा सिटी 20th Anniversary Edition, Amaze Pride Edition आणि WR-V Edge Edition अशी नावं देण्यात आली आहेत.


होंडा सिटीला भारतीय बाजारपेठेत दाखल होऊन २० वर्ष पूर्ण झाली आहेत. स्पेशल एडिशन असलेल्या होंडा सिटीची किंमत १३.७४ लाख रुपये (पेट्रोल) आणि १३.८२ लाख रुपये (डिझेल) ठेवण्यात आली आहे. 



या नव्या कार्सच्या बाहेरील भागात काही बदल करण्यात आले आहेत. या मॉडेलच्या साईड आणि फ्रंट बंपरच्या मध्यभागी क्रोम गर्निश देण्यात आलं आहे. यासोबतच कनेक्ट कार अॅपसोबत एका वर्षाचं फ्री सबस्क्रिप्शनही मिळणार आहे.



होंडा अमेजच्या स्पेशल एडिशनमध्ये १७.७ सेमीचं इन्फोटेनमेंट सिस्टम, फ्रंट सेंटर आर्मरेस्ट आणि रियर पार्कींग कॅमेरा देण्यात आला आहे. या कारच्या पेट्रोल एडिशनची किंमत ६.२९ लाख रुपये आणि डिझेल एडिशनची ७.८३ लाख रुपये किंमत असणार आहे.



होंडा WR-V च्या स्पेशल एडिशनमध्ये नवे एलॉय व्हिल, रियर पार्किंग कॅमेरा आणि रियर पार्किंग सेंसर देण्यात आलं आहे. यासोबतच पेट्रोल वेरिएंटची किंमत ८.०१ लाख रुपये आणि डिझेल वेरिएंटची किंमत ९.०४ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.