होंडाची नवीन दमदार CBR 650F बाईक लॉन्च
होंडा मोटारसाइकल अॅन्ड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने नवीन 2017 CBR650F बाईक भारतात लॉन्च केली आहे. या बाईकची दिल्ली एक्स शोरूम किंमत ७.३० लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.
नवी दिल्ली : होंडा मोटारसाइकल अॅन्ड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने नवीन 2017 CBR650F बाईक भारतात लॉन्च केली आहे. या बाईकची दिल्ली एक्स शोरूम किंमत ७.३० लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.
ही मिडलवेट बाईक मिलेनियम रेड आणि मॅट गनपावडर ब्लॅक मेटॅलीक या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. भारतात या बाईकची बुकींग सुरू झाली आहे. 2017 Honda CBR650F च्या सस्पेंशन आणि डिझाईनमध्ये बदल करून या बाईकला जुन्या बाईकच्या तुलनेत अधिक दमदार केली आहे. जपानी बाईक निर्माता कंपनी होंडाच्या या बाईकला वर्ल्ड डिलरशीपवर बुक केलं जाऊ शकतं. ही डिलरशीप भारतातील २२ शहरांमध्ये आहे.
पावरसाठी यात ६४९ सीसीचं इन लाईन ४ सिलेंडर लिक्वीड कूल्ड इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन ८५.४२ बीएचपीची पावर आणि ६०.४ न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतो. त्यासोबतच या इंजिनला ६ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आलाय.
2017 Honda CBR650F मध्ये नवीन 41mm शोवा ड्य़ूअल बेंडिंग व्हॉल्व टाईप फॉर्क दिला गेलाय. होंडाचा दावा आहे की, हा कमी वजनाचा आहे आणि त्यामुळे कम्प्रेशन रेग्युलेशन अधिक चांगलं झालं आहे. या बाईकचं सिंगल ट्यूब मोनोशॉक सस्पेंशन यूनिट अॅल्यूमिनियम बेस्ड आहे. तसेच, या बाईकच्या फ्रन्ट व्हिलमध्ये ३२०एमएमचा ड्य़ूअल हायड्रॉलिक फ्रन्ट ब्रेक देण्यात आलाय.