जापानी दुचाकी निर्माता कंपनी होंडा भारताशिवाय अन्य विदेशी बाजारांमध्येही आपल्या वाहनाची विक्री करतात. दरम्यान, होंडाने नुकतीच बाजारात आली प्रसिद्ध बाईक Honda Monkey च्या नव्या लाइटनिंग एडिशनला लाँच केलं आहे. थायलंडच्या बाजारपेठेत ही बाईक लाँच करण्यात आली आहे. फक्त 125 सीसी असणाऱ्या या बाईकचा लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. नव्या एडिशनमध्ये कंपनीने अनेक बदल केले आहेत. ज्यामध्ये नवी पेंट स्कीम, कॉस्मेटिक बदलांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Monkey Lightning एडिशनला कंपनीने थोडं प्रीमियम बनवलं आहे. ज्यामुळे तिची किंमतही जास्त आहे. थायलंडमध्ये या बाईकला तब्बल 2 लाख 59 हजारात लाँच करण्यात आलं आहे. याची स्टँडर्ड मॉडेल किंमत 2 लाख 38 हजार इतकी आहे. कंपनीने आपल्या बाईकला अपग्रेड केलं असल्याने, तिची किंमतही वाढली आहे. 


बाईकमध्ये फिचर्स काय आहेत?


या बाईकला पिवळ्या रंगाची शेड असून, ग्लॉसी फिनिशिंग देण्यात आलं आहे. याशिवाय अप-साइड-डाउन फार्क, फ्यूएल टँक, साइड पॅनल्स, स्विंगआर्म आआणि रेअर शॉक ऑब्झर्व्हरलाही पिवळ्या रंगाची शेड दिसत आहे. बाईकमध्ये हेडलँप, इंस्ट्रमेंट कंसोल, ब्रेक आणि क्लच लिव्हर यावर क्रोम वापरण्यात आलं आहे. जे या बाईकला प्रीमियम लूक देतात. 


पॉवर आणि परफॉर्मन्स


या बाईकमध्ये कंपनीने 125 सीसी क्षमतेचं इंजिन वापरलं आहे जे 9.2 bhp पॉवर आणि 11 Nm चा टॉर्क जनरेट करतं. आधीच्या मॉडेलमध्ये 4 स्पीड गेअरबॉक्स मिळत होते. पण यामध्ये 5 स्पीड गेअरबॉक्स देण्यात आलं आहे. कंपनीचा दावा आहे की, बाईक 70 किमी प्रतिलीटर पर्यंत मायलेज देण्यात सक्षम आहे. यामध्ये 5.6 लीटर इंधन टाकी देण्यात आली आहे. 


Honda Monkey मध्ये कंपनी स्टँडर्ड अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम देत आहे, जी बाईकला वेगात असतानाही उत्तम ब्रेकची सुविधा देत आहे. यामध्ये 12 इंचाचं व्हील आहे. घसरणाऱ्या रस्त्यांवरही बाईक संतुलित ब्रेकिंग देते असा कंपनीचा दावा आहे. या बाईकचं वजन 104 किलो आहे. 


भारतात कधी लाँच होणार ?


भारतात ही बाईक लाँच करण्यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान कंपनीने याआधी भारतीय बाजारपेठेत या पॅटर्नवर आधारित Honda Navi ला लाँच केलं होतं. पण ती फार कमाल दाखवू शकली नव्हती. त्यामुळे ही बाईक भारतीय बाजारपेठेत लाँच होईल अशी आशा व्यक्त होत आहे.