धमाकेदार फीचर्ससह Honda ने लॉन्च केली Jazz, जाणून घ्या किंमत
होंडाने भारतात प्रीमियम हॅचबॅक जाझ 2020 लान्च केली आहे
मुंबई : लॉकडाऊनमध्ये ठप्पा झालेली ऑटो इंडस्ट्री आता हळूहळू पुन्हा वर येत आहे. होंडाने भारतात प्रीमियम हॅचबॅक जाझ 2020 लान्च केली आहे. व्ही, व्हीएक्स आणि झेडएक्स या तीन प्रकारांमध्ये ही गाडी भारतात लॉन्च करण्यात आली आहे. हे तीनही वेरिएंट सीव्हीटी ऑटोमॅटीक ऑप्शनमध्ये येतील. BS-VI जाझ फक्त पेट्रोल पर्यायात लान्च केली गेली आहे. नवीन जाझमध्ये 1.2-लीटरचे i-VTEC इंजिन आहे. जे 89 बीएचपी पावर आणि 110 एनएम टॉर्क उत्पन्न करते. यात 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स आहे. सीव्हीटी ऑटोमॅटीक ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल.
नवीन होंडा जाझची किंमत
दिल्लीत V MT याची एक्स शो-रूम किंमत 7.49 लाख रुपये पासून सुरू होते. यानंतर, सीव्हीटी व्हेरिएंटसाठी झेडएक्स 9.73 लाख रुपयांपर्यत आहे. होंडाची ही तिसरी सर्वात मोठी लाँचिंग आहे. यापूर्वी होंडाने 5 जनरेशन होंडा सिटी आणि फेसलिफ्टफेसलिफ्ट WR-V लॉन्च केली होती. होंडाने यापूर्वीच नवीन जाझचे बुकिंग सुरू केले आहे. 21 हजार रुपयांत ही गाडी बुक करता येणार आहे.
न्यू जॅझमध्ये नवीन काय?
या गाडीला समोरून आणि मागून एक वेगळा लूक देण्यात आला आहे. बम्पर आणि सी ब्लॅक ग्रिल क्रोम बॉर्डरसह नवीन एलईडी डीआरएल देण्यात आली आहे. मागील बाजूसही नवीन बम्पर आहे. त्यात सिग्नेचर रियर विंग लाईटही देण्यात आली आहे. आतील भागात बरेच बदल आहेत. यात टचपॅड डॅशबोर्ड, क्रूझ कंट्रोल, ऑटो एसी टचस्क्रीन कंट्रोल पॅनल, एलसीडी डिस्प्ले, स्टीयरिंग माउंट ऑडिओ यामध्ये नवीन देण्यात आले आहेत.
या व्यतिरिक्त एक पुश स्टार्ट-स्टॉप बटन देण्यात आले आहे. वनटच सनरूफ देखील देण्यात आला आहे. यात 17.7 सेमी टचस्क्रीन ऑडिओ व्हिडिओ-नेव्हिगेशन सिस्टम देखील आहे. नवीन जाझची मारुती सुझुकी बालेनो, ह्युंदाई एलिट आय 20, टाटा अल्ट्रोज, टोयोटा ग्लान्झा आणि फोक्सवॅगन पोलो या गाड्यांसोबत या गाडीची स्पर्धा असणार आहे.