भारतीय बाजारपेठेत सध्या दमदार इंजिन असणाऱ्या बाईक्सची प्रचंड क्रेझ आहे. देशात 350cc बाईक सेगमेंटमध्ये रॉयल्ड एनफिल्डचा प्रचंड दबदबा आहे. कंपनीने आपल्या 350cc रेंजमध्ये बुलेट, क्लासिक 350 आणि हंटर 350 सारख्या बाईक्स लाँच केल्या आहेत. देशात दमदार इंजिनच्या बाईक्सची निर्मिती करणाऱ्या तशा अनेक कंपन्या आहेत. पण या सेगमेंटमध्ये रॉयल्ड एनफिल्डला सर्वाधिक पसंती दिली जाते. पण असं असलं तरी देशातील अनेक बाईक कंपन्या रॉयल एनफिल्डला स्पर्धा देण्याच्या हेतूने भारतीय बाजारपेठेत नवनव्या बाईक्स सादर करत असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातच आता होंडा मोटरसायकलने 350cc ची नवी बाईक होंडा सीबी 350 ला (Honda CB350) लाँच केलं आहे. याआधी कंपनीने भारतात 350cc बाईक हायनेस 350 आणि CB350 RS ला लाँच केलं होतं. पण या दोन्ही बाईक्सना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने अपयशी ठरल्या होत्या. पण आता या बाईकच्या आधारे पुन्हा एकदा होंडा 350cc सेगमेंटमध्ये हात आजमावून पाहत आहे. 


किंमत किती? 


कंपनीने या बाईकला एकूण दोन व्हेरिटंयमध्ये लाँच केलं आहे. याचं बेस मॉडेल होंडा सीबीसी 350 डिलक्सची किंमत 1 लाख 99 हजार 900 रुपये आहे. तर डिलक्स प्रो बाईकची किंमत 2 लाख 17 हजार 800 रुपये (एक्स शोरुम) आहेत.  


दरम्यान होंडाने इतर कंपन्यासांठी स्पर्धा करण्याच्या हेतूने ही बाईक्स इतरांच्या तुलनेत फार कमी किंमतीत लाँच केली आहे. ग्राहक ही बाईक होंडाच्या बिगविंग डिलरशिपमधून खरेदी करु शकता. या बाईकची बुकिंग सुरु झाली असून, लवकरच तिची डिलिव्हरी सुरु केली जाणार आहे. 


इंजिन आणि फिचर्स


Honda CB350 मध्ये, कंपनीने 348.36cc क्षमतेचं सिंगल सिलेंडर इंजिन दिलं आहे जे 20.8 bhp पॉवर आणि 29.4 Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये 5 स्पीड गिअरबॉक्ससह स्लिपर आणि असिस्ट क्लच देण्यात आला आहे. बाईकच्या सायलेन्सरमध्ये क्लासिक 350 सारखा आवाज देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. डिझाईनच्या बाबतीतही ही बाईक क्लासिक 350 सारखी दिसते.