Honda ने लाँच केली स्वस्त आणि मस्त बाइक, आकर्षक लूकमुळे बाइकप्रेमी खूश
देशभरात होंडाच्या बाइक्सना सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे होंडाच्या बाइकबाबत ग्राहकांमध्ये कायमच उत्सुकता असते.
Honda Shine Celebration Edition Launch: देशभरात होंडाच्या बाइक्सना सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे होंडाच्या बाइकबाबत ग्राहकांमध्ये कायमच उत्सुकता असते. आता होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडिया अनेक नवे प्रोडक्ट बाजारात आणत आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये Dio स्पोर्ट्स एडिशन आणि Activa 6G प्रीमियम एडिशन लाँच केलं आहे. त्यानंतर कंपनीने आता त्याच्या सर्वाधिक विकल्या जाणार्या शाईनची विशेष आवृत्ती लाँच केली आहे. होंडा शाइन सेलिब्रेशन एडिशन भारतात 78,878 रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली आहे. नवीन होंडा शाइन सेलिब्रेशन एडिशनला कॉस्मेटिक अपडेट्स आणि नवीन रंगसंगती आहे. ही बाइक दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. सेलिब्रेशन एडिशनमध्ये लोगो इंधन टाकीवर आहे.
होंडा शाइन सेलिब्रेशन एडिशन 123.94 सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्ट इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन 7,500 RPM वर 10.5 bhp पॉवर आणि 6,000 RPM वर 11 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. बाइकला सीबीएससोबत मागील बाजूस ड्रम ब्रेक आणि पुढच्या बाजूला ड्रम/डिस्कचा पर्याय मिळतो.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि सीईओ अत्सुशी ओगाटा यांनी सांगितलं की, “देश आगामी सणासुदीच्या हंगामासाठी सज्ज असताना आम्ही आमच्या ग्राहकांचा उत्साह वाढवू इच्छितो. प्रसिद्ध ब्रँड शाईन बाइक सर्वात आकर्षक एक्झिक्युटिव्ह मोटारसायकलींपैकी एक आहे. लाखो भारतीयांच्या मनावर राज्य करत आहे. मला खात्री आहे की सर्व नवीन सेलिब्रेशन एडिशन सणाचे वातावरण उजळून टाकेल आणि आमच्या ग्राहकांना नवीन आनंद देईल."