Honor ने आपल्या स्मार्टफोन सीरीजमध्ये Honor Magic 6 ला लाँच केलं आहे. कंपनीने या सीरीजला Magic 5 चा सक्सेसर असल्याच्या रुपात लाँच केलं आहे. या स्मार्टफोन सीरिजमध्ये मागील सीरिजप्रमाणे डिझाइन पाहायला मिळत आहे. कंपनीने चीनमध्ये या सीरिजला लाँच केलं आहे. या सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन Honor Magic 6 आणि Magic 6 Pro मिळतात. दोन्ही स्मार्टफोन तीन-तीन कॉन्फिग्रेशनसह येतात. हा स्मार्टफोन भारतात लाँच होण्याची शक्यता कमीच आहे. जाणून घ्या स्मार्टफोनची सविस्तर माहिती तसंच किंमत किती असेल याबद्दल...


किंमत किती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Honor Magic 6 चा बेस व्हेरियंट 12GB RAM + 256GB स्टोरेजसह येतो. या व्हेरियंटची किंमत 4399 युआन (जवळपास 51,430 रुपये) आहे. तर याचा टॉप व्हेरियंट 16GB RAM + 512GB स्टोरेजसह येतो. याची किंमत 4,999 युआन (जवळपास 59,380 रुपये) आहे. 


प्रो व्हेरियंटबद्दल बोलायचं गेल्यास याचं बेस वेरिएंट 12GB RAM + 256GB स्टोरेजसह येतं. याची किंमत 5699 युआन (जवळपास 67,695 रुपये) आहे. तर टॉप व्हेरियंट 16GB RAM + 1TB स्टोरेजसह येतो. यासाठी 6699 युआन (जवळपास 78,320 रुपये) मोजावे लागतील. 


फिचर्स काय आहेत?


Honor Magic 6 Pro मध्ये 6.8 इंचाचा 120Hz रिफ्रेश रेट असणारा कर्व्ड OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा हँडसेट Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह येतो. यामध्ये Android 14 आधारित Magic UI 8 मिळतो. 


स्मार्टफोनमध्ये 50MP + 50MP + 108MP चा ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फ्रंटला कंपनीने 50MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. यामध्ये 5600mAh ची बॅटरी आणि 80W ची वायर्ड चार्जिंग सपोर्ट आहे. 


तर Magic 6 मध्ये 6.78 इंचाचा OLED डिस्प्ले मिळतो. हादेखील Snapdragon 8 Gen 3 वर काम करतो. यामध्ये 50MP + 50MP + 32MP चा ट्रिपल रेअर कॅमेरा आणि 50MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. हा मोबाईल 5450mAh च्या बॅटरीसह येतो.