How To Block Upi Id: आजच्या काळात ऑनलाइन पेमेंट हे खूपच लोकप्रिय झाले आहे. आता प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये यूपीआय पेमेंट अॅप गुगल पे, फोन पे आणि पेटीएम असतात. पैसे लवकरात लवकर पाठवण्यासाठी आणि प्रोसेस लवकर होण्यासाठी ऑनलाइन पेमेंट हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण याचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेदेखील आहेत. अलीकडे सायबर क्राइम वाढल्याने डिजीटल पेमेंटच्या वापरावरही अनेक निर्बंध आले आहेत. अशातच जर तुमचा फोन चोरी झाला किंवा हरवला तर अशावेळी तुमचे बँक खाते असुरक्षित असते. अशावेळी सगळ्यात आधी तुमचा युपीआय आयडी ब्लॉक करणेच शहाणपणाचे ठरते. मात्र, युपीआय आयडी ब्लॉक कसा करावा, हे जाणून घेऊया. 


PayTM UPI आयडी कसा ब्लॉक करावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- सगळ्यात आधी पेटीएम बँक हेल्पलाइन नंबर 01204456456 वर कॉल करा.


-  त्यानंतर  Lost Phone या पर्यायावर क्लिक करा


- त्यानंतर एक वेगळा नंबर टाकून त्यानंतर हरवलेला फोन नंबर टाका


- त्यानंतर लॉगआऊट फ्रॉम ऑल डिव्हाइस हे ऑप्शन सिलेक्ट करा. 


- या नंतर पेटीएम वेबसाइटवर जाऊन 24*7 हेल्प ऑप्शन सिलेक्ट करा


- अशा पद्धतीने तुम्ही Report a Fraud किंवा  Message Us ऑप्शन सिलेक्ट करु शकतात


- त्यानंतर तुम्हाला पोलिस रिपोर्ट सह काही डिटेल्स द्यावे लागणार आहेत. त्यानंतर सर्व पडताळणी झाल्यानंतर पेटीएम अकाउंट तात्पुरते बंद केले जाईल. 


गुगल पे युपीआय आयडी कसा ब्लॉक करावा


- सगळ्यात पहिले 18004190157 हा नंबर डायल करा 


- त्यानंतर कस्टमर केअरला पेटीएम अकाउंट ब्लॉक करण्याची माहिती द्या. 


- अँड्रोइड युजर्सना गुगल फाइंड माय फोन हा कोणत्या पीसी किंवा फोनवर लॉगिन करावे लागेल. त्यानंतर गुगल पेचा संपूर्ण डेटा रिमोटली डिलीट करावा लागेल. त्यानंतर तुमचे गुगल पे अकाउंट तात्पुरते ब्लॉक होऊन जाईल. 


- जर तुम्ही आयओएस युजर्स असाल तर find my app किंवा अन्य अॅपलच्या अधिकृत टूलमधून संपूर्ण डेटा डिलीट करुन गुगल पे अकाउंट ब्लॉक करु शकतात.  


फोनपेवर युपीआय आयडी ब्लॉक कसा कराल


- सगळ्यात पहिले 02268727374 किंवा 08068727374  नंबरवर कॉल करा


- ज्या मोबाइल नंबरहून यूपीआय आयडी लिंक आहे त्याविरोधात तक्रार दाखल करा.


- ओटीपी आल्यानंतर तुमचा सिम कार्ड व फोन हरवला गेला असल्याचा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल


- त्यानंतर तुम्हाला कस्टमर केअरसोबत कनेक्ट केले जाईल. त्यानंतर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल ती दिल्यानंतर युपीआय आयडी ब्लॉक करु शकतात.