मुंबई : देशात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणूक पुढच्या वर्षी होणार आहे. याच दरम्यान राज्यातही विधानसभा निवडणूक होणार आहे. २०१९ च्या मे महिन्यात निवडणूक पार पडलेली असेल. यासाठी पुढील महिन्यात मतदार याद्या दुरूस्तीचं काम सुरू होणार आहे. मतदार यादीत आपलं नाव आहे किंवा नाही, याची खात्री करणे देखील महत्वाचे आहे. या दरम्यान ज्या लोकांचं मतदान ओळखपत्र अजून तयार झालेलं नाही, त्यांनी देखील हे मतदार ओळखपत्र बनवून घेण्याची गरज आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे यावेळेस मतदान ओळखपत्र हे रंगीत आणि प्लास्टिकचं असणार आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने तुम्हाला यावेळी ही सूट दिली आहे की, तुम्ही घरी बसून तुमचं मतदान ओळखपत्र बनवू शकतात.


असं येईल आकर्षक रंगीत, प्लास्टिकचं निवडणूक ओळखपत्र घरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधेनुसार तुम्ही घरी बसून तुमचं निवडणूक ओळखपत्र बनवू शकतात. घरूनच कम्प्यूटरवर नवीन आयडी कार्ड बनवण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकतात, तो अर्ज ऑनलाईन असणार आहे. तुम्हाला नेमक्या कोणत्या वेबसाईटवर जावं लागेल याची माहिती बातमीत पुढे दिलेली आहे.


निवडणूक आयोगाकडून अनेक पर्याय


निवडणूक आयोगाने या साईटवर अनेक पर्याय दिले आहेत. नवीन ओळखपत्रासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. जर तुमच्या मतदान ओळखपत्रात काही चूक असेल, तर ती देखील सुधारू शकता. तुम्ही मतदान ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे, तर ते काम कुठपर्यंत आलं आहे, याची माहिती तुम्हाला मिळू शकते.


फॉर्म ६ काळजीपूर्वक भरा


नवीन कार्ड बनवण्याच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर निवडणूक आयोगाचा फॉर्म ६ उघडतो. या फॉर्ममधील प्रत्येक कॉलममध्ये सावधानतेने माहिती भरा. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे या वेबपेजवर जाऊन, तुम्ही देशातील कोणत्याही राज्यातील, कोणत्याही शहराचं, गावाचं ओळखपत्र बनवू शकता.


हे असतील पुरावे


सर्व कॉलम भरल्यानंतर त्यात फोटो, वयाचा दाखला आणि पत्ता यांचे पुरावे अपलो़ड करण्याचं ऑप्शन येईल. यावेळी असाच फोटो अपलोड करा, ज्यात फोटोत तुमची प्रतिमा सोडून मागचा भाग पांढरा असेल.


चूक सुधारण्याची संधी


सर्व माहिती, फोटो आणि प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर, ही माहिती सेंड करा. जर एखादी माहिती चुकीची भरली गेली असेल. तर ती चूक सुधारण्यासाठी तुम्हाला १५ दिवसांची मुदत दिली आहे. १५ दिवसाच्या आत तुम्ही पाठवलेल्या माहितीत दुरूस्ती करू शकता.


वयाच्या प्रमाणपत्रासाठी जमा करा हे दस्तावेज


जन्माच्या पुराव्यासाठी जन्माचा दाखला, शाळासोडल्याचा दाखला, हायस्कूलच्या बोर्डाच्या परीक्षेचं मार्कशीट, पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स किंवा आधार कार्डची फोटो कॉपी तुम्ही अपलोड करू शकता.


घरचा पत्ता - पुरावा


घरच्या पत्ता हाच आहे, त्यासाठी पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स, बँकेचं पासबूक, पोस्ट ऑफिसचं पास बूक, रेशन कार्ड, वीजेचं बील, पाणी बील, गॅस कनेक्शन कॉपी, टेलिफोन बिल, किंवा भारतीय पोस्ट खात्याकड़ून तुमच्या घरी आलेल्या पत्राची मूळपत्र अपलोड करू शकता.


खालील वेबसाईटवर जा


ही सर्व माहिती दिल्यानंतर काही वेळाने किंवा दिवसांनी निवडणूक आयोगाकडून, तुमच्या भागातलं बीएलओ (बूथ लेवल ऑफिसर) तुमच्या घरी येईल, आणि तुम्ही जी काही माहिती दिली आहे, त्याची चौकशी करेल. 


योग्य ते कागदपत्र असल्याची खात्री केल्यानंतर, बीएलओ आपला रिपोर्ट देणार आहे आणि या एक महिन्याच्या प्रक्रिकेनंतर, तुमच्या घरी रंगीत निवडणूक ओळखपत्र प्लास्टिक कार्डच्या स्वरूपात तुमच्या घरी येणार आहे. यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या http://www.nvsp.in या वेबसाईटवर जावं लागेल.