‘No Network’ मध्येही करता येणार कॉल, जाणून घ्या ‘या’ भन्नाट फीचर्सबद्दल
जेव्हा आपल्याला अर्जेंट कॉल करायचा असतो तेव्हा बर्याच वेळा नेटवर्कची समस्या उद्भवते. आणि त्यावेळी आपल्याला काहीही करून हा कॉल लागला पाहिजे असं वाटत. त्यातच काही भागात नेटवर्क कव्हरेज आणि इंटरनेट देखील स्लो आहे. पण
मुंबई: जेव्हा आपल्याला अर्जेंट कॉल करायचा असतो तेव्हा बर्याच वेळा नेटवर्कची समस्या उद्भवते. आणि त्यावेळी आपल्याला काहीही करून हा कॉल लागला पाहिजे असं वाटत. त्यातच काही भागात नेटवर्क कव्हरेज आणि इंटरनेट देखील स्लो आहे. पण तुम्हाला माहित आहे का की या नेटवर्क नसलेल्या परिस्थितीतही तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून फोन कॉल करू शकता. आज आम्ही तुम्हाला असेच एक अप्रतिम फिचर सांगणार आहोत. तसेच, ही सेवा पूर्णपणे विनामूल्य म्हणजेच फ्री आहे. होय, या सेवेसाठी ग्राहकांना कोणतेही वेगळे पैसे मोजावे लागणार नाहीत.
भारतात 5G आता लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. 5G सेवा सुरू होताच, 5G नेटवर्कवर सुपर फास्ट 5G इंटरनेट उपलब्ध होईल, Jio, Airtel आणि Vi हेच स्वप्न दाखवत आहेत. जरी दुसरीकडे मोबाईल वापरकर्ते म्हणत आहेत की 5G आणण्यापेक्षा तुमचे 4G नेटवर्क योग्य असणे चांगले आहे. मात्र फोनमध्ये नेटवर्क नसल्यास किंवा सेल्युलर सेवा कमी असल्यास, परंतु अशा परिस्थितीत व्हॉईस कॉल करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी जे तंत्रज्ञान शोधले गेले आहे त्याला VoWiFi म्हणजेच WiFi कॉलिंग म्हणतात. येथे VoWiFi म्हणजे व्हॉइस ओव्हर वायफाय. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या तीन टेलिकॉम कंपन्यांनी देशातील त्यांच्या ग्राहकांसाठी ही सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे मोबाइल वापरकर्ते खराब नेटवर्कच्या बाबतीत कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सहजपणे व्हॉइस कॉल करू शकतात.
तुमच्या फोनमध्ये वाय-फाय कॉलिंग कसे चालू करावे
1. Android स्मार्टफोन किंवा iPhone दोन्हीमध्ये VoWiFi सक्रिय करण्यासाठी, फोनच्या सेटिंग्ज मेनूवर जा आणि कनेक्शन पर्याय शोधा.
2. येथे तुम्हाला वाय-फाय कॉलिंगचा पर्याय मिळेल, तो सक्षम करा.
3. हे सेटिंग सक्षम केल्यानंतर, मोबाइल फोन कोणत्याही विद्यमान WiFi नेटवर्कशी कनेक्ट करा.
4. VoLTE आणि VoWiFi दोन्ही पर्याय इथे येत असतील तर दोन्ही चालू करा, ते अधिक चांगले होईल.
5. आता तुम्हाला एक सामान्य कॉल करावा लागेल, जर सिग्नल कमकुवत असेल तर फोन आपोआप मोबाइल नेटवर्कवरून वायफायवर स्विच होईल आणि VoWiFi वर कॉल चालू राहील.