How To Clean Laptop Keyboard Safely: कोरोना काळानंतर लॅपटॉपचं महत्त्व वाढलं आहे. वर्क फ्रॉम होममुळे लॅपटॉपचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. लॅपटॉप कुठेही नेणं सहज शक्य आहे. त्यामुळे ऑफिस आणि घरी लॅपटॉपचा वापर वाढला आहे. ऑफिस किंवा घरी काम करता अनेकदा कीबोर्ड अस्वच्छ झाल्याचं दिसून येतो. अनेकदा कीबोर्डमध्ये धूळ आणि इतर कचरा जमा होतो. यामुळे कीबोर्ड खराब होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे कीबोर्ड वेळोवेळी स्वच्छ करणं आवश्यक आहे. पण कधी कधी चुकीच्या पद्धतीने कीबोर्ड स्वच्छ केल्यानं नुकसानही होऊ शकतं. किबोर्ड आणि लॅपटॉपची काळजी घेत स्वच्छ करणं गरजेचं आहे. लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर क्लोथ, सॉफ्ट पेंटब्रश, कॉटन स्वॉब, कम्प्रेस्ड एअर, कीबोर्ड क्लीनर यांची आवश्यकता आहे. चला जाणून घेऊयात कीबोर्ड कशा पद्धतीने स्वच्छ करायचा..


लॅपटॉप अशा पद्धतीने स्वच्छ कराल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. सर्वप्रथम लॅपटॉपचं अ‍ॅडप्टर काढून घ्या आणि लॅपटॉप शटडाउन करा. असं केल्याने इलेक्ट्रिक प्रॉब्लेम येत नाही. दुसरीकडे कीबोर्ड स्वच्छ करताना चुकून कोणताही मेसेज किंवा की टाइप होणार नाही. 


2. बंद असलेला लॅपटॉप व्यवस्थितरित्या पकडा आणि उलटा करून स्वच्छ करा. यामुळे त्यात अडकलेली डस्ट, खाण्याचे तुकडे आणि केस बाहेर पडतील. त्यामुळे कीबोर्ड स्वच्छ करणं सोपं होईल. 


3. आता लॅपटॉप मायक्रोफायबर क्लोथ, सॉफ्ट पेंटब्रश किंवा कम्प्रेस्ड एअर गॅजेटच्या मदतीने क्लीन करा. असं करताना जास्त दाब देऊ नका. हलक्या हाताने स्वच्छ कराल.


बातमी वाचा- Credit Card: सर्वोत्तम क्रेडिट कार्ड कसे निवडाल? हे सात प्रश्न करतील मदत


4. कीबोर्ड स्वच्छ करण्यासाठी लिक्विड क्लीनर बाजारात सहज मिळतं. मात्र त्याचा वापर करताना काळजी घेणं आवश्यक आहे. लिक्विड कीबोर्डवरवर स्प्रे करू नका. एक सॉफ्ट कपडा घेऊन त्यावर क्लीनर लावा आणि हलक्या हाताने स्वच्छ करा. लिक्विड डायरेक्ट अप्लाय केल्याने नुकसान होऊ शकतं.