Kitchen Hacks: 2 कप पाण्यात लिंबाचा रस टाकून Microwave मध्ये ठेवा; असा Result मिळेल की व्हाल अश्चर्यचकित
How To Clean Microwave Interesting Hack: आज मायक्रोव्हेव ही घरोघरी वापरली जाणारी गोष्ट झाली आहे. मात्र अनेकांना मायक्रोव्हेव नेमका साफ कसा करावा याबद्दलची कल्पना नसते. बरेच लोक केवळ ओल्या फडक्याने मायक्रोव्हेव पुसून घेतात.
How To Clean Microwave: टीव्ही, फ्रिजप्रमाणेच आज घरोघरात दिसून येणारी गोष्ट म्हणजे मायक्रोव्हेव. झटपट खाणं गरम करण्यापासून ते विकेण्डला अगदी निवांत वेळात खाणं बनवण्यासाठी आज अनेक शहरांमधील घरांमध्ये मायक्रोव्हेव वापरला जातो. मायक्रोव्हेव वापरणाऱ्यांची संख्या मागील काही वर्षांमध्ये वाढल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे वर्षाचे 12 ही महिने ही वस्तू अगदी काही क्षणांमध्ये खाणं गरम करण्यासाठी वापरता येते. शहरांमधील धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये मायक्रोव्हेवसारखी वस्तू नक्कीच फार उपयोगाची ठरते. मात्र मायक्रोव्हेव जितका उपयोगी ठरतो तितकीच त्याची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. असं न केल्यास तो लवकर खराब होण्याची शक्यता असते.
अनेकजण केवळ कापडाने करतात साफ
अनेकांना मायक्रोव्हेव स्वच्छ करायचा म्हणजे केवळ आजून ओला फडका फिरवायचा असं वाटतं. मात्र हा समज चुकीचा आहे. बऱ्याच जणांना मायक्रोव्हेव कसा साफ करावा याची कल्पनाच नसते. तर काहींना इच्छा असूनही हे काम फार किचकट वाटतं. अनेकदा सांडलेलं अन्न किंवा गरम करताना चिकटलेलं अन्न तसेच मायक्रोव्हेवमध्ये चिटकून राहतं. मग हे कसं साफ करावं कळत नाही. अर्थात आता बाजारात अनेक गोष्टी उपलब्ध आहेत ज्याच्या मदतीने मायक्रोव्हेव साफ करता येतो. मात्र यामधील केमिकल्सबद्दलही अनेकांना शंका वाटते. म्हणून या लेखात आपण मायक्रोव्हेव साफ करण्यासाठी घरातील एक साधी छोटी नैसर्गिक गोष्ट कशी वापरता येईल याबद्दल जाणून घेणार आहोत. नैसर्गिक गोष्टी या उपकरणांसाठी फार हानीकारक नसतात. तसेच त्यांच्या वापराने काही रिअॅक्शन होऊन मशीन बिघडेल अशी भितीही नसते. त्यामुळेच ते बाजारातील केमिकलयुक्त गोष्टींपेक्षा अधिक सोयीस्कर ठरतात.
दुर्गंधी आणि गंज दोघांवर एकच उपाय
तर वर आपण ज्या छोट्या नैसर्गिक गोष्टीबद्दल बोलत होतो ती आहे लिंबू. लिंबू हे साफसफाई करण्यासाठी वापरता येईल असं भन्नाट सोल्यूशन आहे. खरंतर लिंबाचा वापर किचनमधील गोष्टी साफ करण्याबरोबरच घरातील अनेक गोष्टींच्या साफसफाईसाठी करता येईल. लिंबामध्ये नैसर्गिक अॅसिडिक गुणधर्म असतात. हेच गुणधर्म वस्तूंना लागलेला गंज हटवण्यासाठी मदत करतो. तसेच लिंबाचा सुगंध मायक्रोव्हेमध्ये कायम राहतो. त्यामुळे मायक्रोव्हेमधून दुर्गंधी येण्याचा प्रश्नही निकाली काढता येतो.
नेमका कसा करावा वापर?
मायक्रोव्हेव साफ करण्यासाठी लिंबू कसा वापरावा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते ही आम्ही सांगणार आहोत. एक मोठं लिंबू कापून त्याचा रस काढून घ्यावा. एक मोठा चमचाभर रस 2-3 कप पाण्यामध्ये मिसळता येईल असं मिश्रण आवश्यकतेनुसार बनवून घ्यावं. हे पाणी एका मायक्रोव्हेव फ्रेण्डली भांड्यात काढून घ्यावं. त्यानंतर हे भांडं मायक्रोव्हेमध्ये ठेऊन 3 ते 4 मिनिटांसाठी उच्च तापमानावर मायक्रोव्हेव सुरु ठेवावा.
काय फरक पडणार?
या पाण्याची वाफ मायक्रोव्हेवमध्ये तयार होईल. लिंबाचा रस मिश्रित पाण्याच्या या वाफेमुळे मायक्रोव्हेमधील वास तर कमी होईल. तसेच मायक्रोव्हेवमध्ये चिकटलेले अन्न पदार्थांचे कण मायक्रोव्हेवच्या पृष्ठभागापासून विलग होती. यानंतर मायक्रोव्हे बंद करुन नुसत्या ओल्या कापडाने तो पुसून घेतला तरी अगदी चकाचक होईल. तसेच ओल्या कापडावर लिंबू पिळून त्या कापडाने मायक्रोव्हेव बाहेरुन पुसला तरी त्यावरील गंज निघून जातो.