मुंबई: मोबाईल म्हणजे आजच्या काळात जीव की प्राण. त्यातही अनेकदा मेमरी कार्ड आणि फोनचा डेटा एवढा होतो की फोनमध्ये जागाच कमी पडू लागली आहे. मोबाईलमध्ये स्टोरेज फुल असं सतत मेसेज येत राहतात आणि कायम तो आपल्याला हे स्टोरेज कमे करण्यासाठी मेसेज देत राहातो. या सगळ्या कटकटीपासून सुटका हवी असेल तर तुम्ही या ट्रिक्स नक्की वापरून पाहायला हव्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बऱ्याचदा आपल्या फोनमध्ये जास्त अॅप्स असतील किंवा मेमरी जास्त भरली असेल तर फोन हँग होऊ लागतो. त्यामुळे आपल्याला फोनमध्ये काम करणं त्रासदायक ठरतं चिडचिड होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या सगळ्या कटकटीपासून लांब राहण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. 


तुम्ही फोनमध्ये क्लिनिंग अॅप वापरू शकता. या क्लिनिंग अॅपचा आधार घेऊन मेमरी रिकामी करू शकता. किंवा दुसरा आणि सर्वात उत्तम उपाय फाइल्स बाय गुगल अॅप हा आहे. याचा वापर करून जंक फाइल्स, ड्युप्लीकेट फाइल्स, मीग्स किंवा लार्ज फाइल्स फोनमधून डिलीट करू शकता. 


आपल्या फोनमध्ये काही टेम्पररी फाइल्सही तयार होत असतात. त्या वेळोवेळी डिलीट करणं गरजेचं आहे. कॅशे उडवल्याने आपला फोन हँग होणार नाही. त्यामुळे वेळोवेळी कॅशे डिलीट करणं गरजेचं आहे. 


तुमच्या फोनमध्ये फोटो आणि व्हिडीओ जास्त असतील तर ते सुरक्षित ठिकाणी ठेवा. जे उपयोगाचे नाहीत क्लाउड स्टोरेजची मदत घ्या. त्यामुळे फोनचं स्टोरेज कायम फूल राहणार नाही. फोनची मेमरी फ्री राहण्यासाठी फायदा होईल. याशिवाय व्हॉट्सअॅफ फेसबुकवरून येणारे नको असलेले फोटो वेळोवेळी डिलीट करा. त्यामुळेही आपलं स्टोरेज भरलं जाणार नाही.