मुंबई : सध्या लोकं चॅटींग करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला पसंती दाखवत आहेत. म्हणजेच सगळ्यात जास्त जे चॅटिंग अ‍ॅप वारलं जातं त्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप पहिल्या क्रमांकावर आहे.  चॅटिंगपासून ते व्हिडिओ कॉलिंग किंवा व्हॉईस कॉलिंगपर्यंत लोकं व्हॉट्सअ‍ॅपचाच वापर करतात. परंतु बऱ्याचदा असे होते की, व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल रेकॉर्डींगचा पर्याय नसल्याने काही कामाच्या गोष्टी जर आपल्याला रेकॉर्ड करुन ठेवायच्या असतील तर ते शक्य होत नाही. त्यात जर आपण प्रवास करत असू तर आपल्याकडे, महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवाण्यासाठी काहीही पर्याय नसेल तर, अशा परिस्थितीत कॉल रेकॉर्डींग करणे फायदेशीर ठरते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु आता यासाठी काहीच अडचण येणार नाही. आता तुम्ही अगदी सोप्या मार्गाने व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल रेकॉर्डींग करू शकता.


यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने असे कोणतेही रेकॉर्डिंग फीचर अर्थात बटण दिले नाही, परंतु काही ट्रिक्स वापरुन तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करु शकता.


व्हॉट्सअ‍ॅप  रेकॉर्डिंग करण्यासाठी, तुम्हाला प्रथम आपल्या मोबाइलमध्ये थर्ज पार्टी अ‍ॅप डाऊनलोड करावा लागेल. असे करण्यासाठी, Google Play Store वर जा आणि Cube Call Recorder  डाऊनलोड करा. नंतर Cube Call Recorder  उघडा आणि सेट अप करा आणि मग व्हॉट्सअ‍ॅपवर जा.


आता तुम्हाला ज्या व्यक्तीसोबत बोलायचे असेल त्यांना व्हाट्सअ‍ॅप कॉल करा. कॉल दरम्यान तुम्हाला क्यूब कॉलचे चिन्ह दिसेल. याचा अर्थ असा आहे की, ते आपले काम करत आहे.  परंतु तुम्हाला तुमच्या स्वत: च्या रिस्कवर हा थर्ज पार्टी अ‍ॅप घ्यावा लागेल.


तुम्हाला जर यात काही अडचण आल्या तर तुम्ही ते अ‍ॅप उघडा आणि सेटिंग्जवर जा आणि तेथे Force VoIP पर्याय निवडा. मग पुन्हा कॉल करा. या शिवाय कोणतीही समस्या असेल तर मग, ही ट्रिक तुमच्या स्मार्ट फोनमध्ये कार्य करण्यासाठी सक्षम नसेल.