मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलं आहे. अनेकदा सतत कम्यूटरवर काम करत असताना ब्राऊझरमध्ये सुरु असलेले टॅब अचानक बंद होतात. त्यानंतर अनेक वेळा सर्व ठिकाणी पुन्हा संपूर्ण लॉगइन करावं लागू शकतं. मात्र डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर अचानकपणे टॅब बंद झाल्यास त्यात वेळ न घालवता पुन्हा त्वरित ओपन करता येऊ शकतात. यासाठी काही ट्रिक्स फायदेशीर ठरु शकतात.


क्रोम Chrome ब्राऊझर -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेस्कटॉपवर क्रोम ब्राऊझरमधून काम करत असताना अचानक टॅब बंद झाल्यास, कोणत्याही ओपन टॅबवर राईट क्लिक करा. त्यानंतर खालच्या बाजूला रिओपन क्लोज टॅब हा पर्याय येईल. त्यावर क्लिक केल्यास अचानक बंद झालेले टॅब पुन्हा सुरु होऊ शकतात. त्याशिवाय किबोर्डवर Ctrl/Cmd + Shift + T या शॉर्टकटचा वापर करुनही बंद झालेले टॅब रिओपन करता येऊ शकतात. 


फायरफॉक्स Firefox ब्राऊझर -


लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर फायरफॉक्स ब्राऊझरमधून काम सुरु असताना टॅब बंद झाल्यास कोणत्याही ओपन टॅबवर राईट क्लिक करा. त्यानंतर अन डू क्लोज टॅब असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर टॅब रिओपन होऊ शकतात. फायरफॉक्स ब्राऊझरमधून काम करताना किबोर्डद्वारेही Ctrl/Cmd + Shift + T या शॉर्टकटचा वापर करुन टॅब पुन्हा ओपन करता येऊ शकतात.


सफारी Safari ब्राऊझर -


सफारी ब्राऊझरमधून काम करत असताना या ब्राऊझरच्या हिस्ट्री > रीओपन लास्ट क्लोज विंडो या पर्यायावर क्लिक करुन अचानक बंद झालेले टॅब रिओपन करता येऊ शकतात. किबोर्डवरील Cmd + Shift + T या शॉर्टकटनुसारही टॅब रिओपन होऊ शकतात. 


ऐज Microsoft Edge ब्राऊझर - 


कोणत्याही ओपन टॅबवर राईट क्लिक करा. त्यानंतर रिओपन क्लोज टॅब हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करुन बंद झालेले टॅब पुन्हा सुरु करता येऊ शकतात. त्याशिवाय Ctrl/Cmd + Shift + T हा शॉर्टकट वापरुनही टॅब रिओपन होऊ शकतात.


वाचा - Wifi स्पीड वाढवण्यासाठी काही उपयोगी ट्रिक्स