मुंबई : स्मार्टफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, एचटीसी कंपनीने आपले HTC Desire 12, Desire 12+ हे दोन स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. यापूर्वीच कंपनीने आपले हे दोन फोन्स मार्च महिन्यात ग्लोबली लॉन्च केले होते. या दोन्ही फोन्सची खास बाब म्हणजे दोघांमध्येही 18:9 अॅस्पेक्ट रेशिओचा डिस्प्ले देण्यात आला आहे. चला तर मग पाहूयात या दोन्ही फोन्सची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स...


HTC Desire 12 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोनला ड्युअल नॅनो सिम सपोर्ट करतं. फोनमध्ये 5.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, मीडियाटेकचा क्वॉडकोअर MT6739 प्रोसेसर, 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज मिळणार आहे. ही स्टोरेज क्षमता 2TB पर्यंत वाढवता येणार आहे. फोनच्या कॅमेऱ्याचा विचार केला तर यामध्ये 13MP रिअर पॅनल आणि 5MP फ्रँट कॅमेरा देण्यात आला आहे.


रिअर कॅमेऱ्यासोबत एलईडी फ्लॅश लाईटही मिळणार आहे. फोनमध्ये 2730mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे आणि कनेक्टिविटीसाठी यामध्ये 4G LTE, वाय-फाय, ब्ल्युटूथ v4.2, GPS/A-GPS, मायक्रो USB आणि 3.5mm चा हेडफोन जॅक मिळणार आहे. या फोनची किंमत 15,800 रुपये ठेवण्यात आली आहे.


HTC Desire 12+ ची किंमत आणि स्पेसिफिकेशन


या फोनमध्ये ड्युअल सिम, अँड्रॉईड ओरियो 8.0, 6 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर, 3GB रॅम आणि 32 GB स्टोरेज मिळणार आहे. ही स्टोरेज क्षमता 2TB पर्यंत वाढवता येणार आहे.


या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे यापैकी एक कॅमेरा 13 MP आणि दुसरा 2 MP चा आहे. तर, फ्रंट कॅमेरा 8 MP आहे. फोनमध्ये 2965 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटीसाठी 4G LTE, वाय-फाय, ब्ल्यूटूथ v4.2, GPS/A-GPS, मायक्रो-USB आणि 3.5 mm चा हेडफोन जॅक मिळणार आहे. या फोनची किंमत 19,790 रुपये आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आलं आहे.