Humane AI Pin : स्मार्टफोनशिवाय आपला दिवस सुरु होत नाही आणि संपतही नाही. माणसानं स्मार्टफोनमध्ये जग शोधलंय. घरगुती फोन, कॉडलेस, साध्या मोबाईलपासून सुरु झालेला प्रवास दोन दशकात स्मार्टफोनपर्यंत आलाय. पण आता हेच स्मार्टफोन जगातून कायमचे गायब होवू शकतात. कारण, आता स्मार्टफोनची जागा Humane AI Pin घेणार आहे. Humane AI Pin चे बुकींग सुरु झाले आहे. मार्च 2024 मध्ये याची डिलीव्हरी सुरु होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ह्यूमन या कंपनीने एआय पिनची निर्मिती केली आहे. इम्रान चौधरी आणि बेथनी बाँजोर्नो हे या कंपनीचे संस्थापक आहेत. बेथनी बोंगिओर्नो हे ऍपलचे माजी कर्मचारी आहेत. Humane AI Pin ही स्मार्टफोनच्या क्षमतेच्या जवळपास आहे. 
एआय पिन काय आहे? 


एआय पिन हे दोन बोटांमध्ये पकडता येईल इतका छोटाशा चौकोनी बॉक्सच्या आकाराचे डिव्हाइस आहे. यामध्ये एक प्रोसेसर संगणक, एक बॅटरी आणि या दोघांना जोडणारे हूक असे तीन मुख्य भाग आहेत. हे उपकरण शर्टच्या कॉलरजवळ वापकरर्त्याच्या साईनुसार कपड्यावर लावता येवू शकते. या डिव्हाईसच्या दर्शनी भागावर स्पर्श करताच ते कार्यान्वित होते. त्यानंतर बोटांच्या हालचाली  तसेच व्हॉईस कमांडच्या मदतीने  हे डिव्हाईस वापरता येते.


स्मार्टफोनची जागा घेणार AI Pin 


AI Pin हे स्मार्टफोनची जागा घेवू शकतो
भविष्यात AI Pin हे स्मार्टफोनची जागा घेवू शकतो. कारण, मोबाईलमध्ये असणारे जवळपास सर्व फिचर्स या AI Pin मध्ये मिळणार आहेत.  या डिव्हाईसच्या मदतीने 13 मेगापिक्सेलची क्वालिटी असणारे फोटो कॅप्चर होणार आहेत. व्हॉईस कमांडच्या मदतीने AI Pin टेक्सट मेसेज देखील पाठवू शकते. तसेच याच्या मदतीने फोनसारखे कॉलिंग देखील करता येते. या डिव्हाईसमध्ये एक लेझर प्रोजेक्टर आहे. त्याची प्रतिमा तळहातावर घेऊन आलेल्या कॉलची किंवा मेसेजची माहिती पाहता येते.


AI Pin ची किंमत किती?


Humane AI पिन हे एक वेअरेबल डिव्हाईस आहे. यात AI तंत्रज्ञान देखील वापरण्यात आले आहे. यात मोबाईल सारखा डिस्प्ले नाही. तळहात तसेच कोणत्याही सरफेसवर प्रोजेक्टरप्रमाणे सर्व काही पहायला मिळेल. Humane AI पिनची किंमत 699 US डॉलर इतकी आहे. यासाठी, सेल्युलर डेटा आणि फोन नंबरसाठी  मासिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. यासाठी 24 डॉलर आकारले जातात. AI पिनची प्री-ऑर्डर सुरू झाली. मार्च 2024 मध्ये याची डिलीव्हरी होणार आहे.  Humane चे अधिकृत X हँडलवरुन याच्या बुकींगबाबतची माहिती देण्यात आली आहे.