जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक SUV,जाणून घ्या फिचर्स
सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक व्हेईकल कॉन्सेप्ट कार
नवी दिल्ली : संपूर्ण जग सध्या पेट्रोल आणि डिझेलचा स्वस्त पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहत आहे. पण कॅलिफोर्नियाची स्टार्टअप कंपनी हम्बल मोटर्सने आणखी एक चांगला पर्याय ऑफर केलाय. कंपनी सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक व्हेईकल कॉन्सेप्ट कार बाजारात आणत आहे.
डिझाइन आणि बॉडी टाईपबद्दल बोलायचं झाल्यास SUV जगातील पहिली सौर उर्जा चालविणारी गाडी आहे. ही एसयूव्ही कारमधील बॅटरी सूर्यप्रकाशाने चार्ज होते आणि ड्रायव्हिंगची चांगली रेंज देते.
त्याचे डिझाइन मोठ्या प्रमाणात क्रॉसओव्हर मॉडेलसारखेच आहे. त्याच्या छप्पर आणि खिडकीवर एकूण 80 चौरस फूट सौर पॅनेल बसविण्यात आले आहेत. जे वाहनात असलेल्या बॅटरी पॅकला सूर्यप्रकाशाने चार्ज करतात. एसयूव्ही केवळ सौर पॅनेलद्वारे चार्जिंगद्वारे चालविली गेली तर ती दिवसाला 96 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.
Humble One चे वजन कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. जेणेकरुन हे वाहन चांगले मायलेज देईल. या क्रॉसओव्हर एसयूव्हीचे एकूण वजन 1,814 किलो आहे, जे टेस्ला मॉडेल एसपेक्षा साधारण 348 किलो कमी आहे. इंटर्नल बॅटरीवर, ही एसयूव्ही सिंगल चार्जमध्ये 800 किमी पर्यंत ड्राईव्हिंग रेंज देते. इतकेच नव्हे तर या एसयूव्हीची पिकअप टेस्लापेक्षा खूप चांगली आहे.
या कारमध्ये बसायची जागा आहे. या चार दरवाजाच्या एसयूव्हीमध्ये एकूण पाच जणांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनात 80 चौरस फूटाचे फोटोवोल्टिक (Photovoltaic)सौर सेल्स आहेत. त्याची लांबी 198 इंच आहे. जी टेस्लाच्या मॉडेल एक्स प्रमाणेच आहे. जरी या कारचे वजन यापेक्षा बरेच कमी असली तरी यातील इलेक्ट्रिक मोटर 1,020 एचपी पर्यंतची वीज निर्माण करते आणि त्याची उच्च गती ताशी 260 किलोमीटर आहे. या व्यतिरिक्त, ही एसयूव्ही फक्त 2.5 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेगाने घेण्यास सक्षम आहे.
SUV ने वापरल्या गेलेल्या टेक्नीकबद्दल माहिती समोर आणली नाहीय. पण दररोजच्या प्रवासासाठी ही एसयूव्ही एक चांगला पर्याय असेल. लॉन्च होण्याआधी किंमतीबद्दल सांगणे कठीण आहे. वाहन तज्ञांच्या मते, या वाहनाची किंमत अंदाजे 1,09,000 अमेरिकन डॉलर्स इतकी असेल. त्याचे बुकिंग सुरू झाले आहे. 2024 पर्यंत या वाहनाची विक्री सुरु झालेली असेल.