आता फक्त Alexa नाही तर गाडीही आवाजाने होणार स्टार्ट; सेफ्टी फिचर्स पाहून थक्क व्हाल, किंमत फक्त...
Hyundai CRETA Launched: आज हुंडाईने भारतीय बाजारपेठेत नवी क्रेटाचे नवीन मॉडेल लाँच केले आहे. जाणून घेऊया किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन
Hyundai CRETA Facelift Launched: साउथ कोरियाची कार निर्माती कंपनी हुंडाईने आज भारतीय बाजारपेठेत बहुप्रतीक्षित एसयुव्ही Hyundai CRETA चे एक नवीन फेसलिस्ट मॉडेल विक्रीसाठी लाँच केले आहे. आकर्षक लुक, पॉवरफुल इंजिन आणि जबरदस्त सेफ्टी फिचर्ससह ही नवी एसयुव्ही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. एसयुव्हीची सुरुवातीची किंमत 10,99,999 (एक्स शोरुम) इतकी आहे.
अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या एसयुव्हीमध्ये अनेक बदल बघायला मिळत आहे. आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक फिचर्स देण्यात आले आहेत. या एसयुव्हीचे कटिंग एड्ज टेक्नोलॉजी आणि शानदार लुक युवकांना आकर्षित करेल, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने या एसयुव्हीमध्ये LED लायटिंगचा भरपूर वापर केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, क्रेटा फेसलिस्टच्या बाहेरच्या डिझाइनमध्ये भारतीय ग्राहकांच्या आवडीनुसार बदल करण्यात आले आहेत. Hyundai ची ही मिडसाइज SUV गेल्या कित्येक दशकांपासून भारतीयांमध्ये लोकप्रिय आहे.
हुंडाईने क्रेटाच्या इंटिरीयरमध्ये अनेक अपडेट केले आहेत. यात ट्विन्स 10.25 इंचाची कनेक्टेड स्क्रीन, डॅश आणि एसी वेंट डिझाइनमध्ये बदल केले आहेत. तसंच, अनेक नवीन फिचर्स देण्यात आले आहे. नवीन क्रेटाचे केबिन अधिक शानदार करण्यात आली आहे. यात इंटिग्रेटेड इंफोटेन्मेंट सिस्टम आणि डिजीटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे.
इंजिन आणि परफॉर्मेंस
क्रेटा फेसलिस्टमध्ये इंजिन मॅकेनिजममध्ये कोणतेच बदल करण्यात आलेले नाहीयेत. नवीन हुंडाई क्रेटा तीन इंजिनचे पर्याय आहे. ज्यामध्ये स्पोर्टी आणि पॉवर पॅक्ड 1.5 लीटर कप्पा टर्बो GDI पेट्रोल, 1.5 लीटर MPI पेट्रोल आणि 1.5 लीटर U2 CRDI डिझेल इंजिन असे पर्याय देण्यात आले आहेत. CRETA 6-स्पीड मॅन्युअल, IVT (इंटेलिजेंट व्हेरिएबल ट्रान्समिशन), 7-स्पीड DCT (ड्युअल क्लच ट्रान्समिशन) आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह चार ट्रान्समिशन पर्यायांसह ऑफर केली आहे.
सेफ्टी फर्स्ट
क्रेटाच्या बॉडी स्ट्रक्चर आणखी मजबूत करण्यात आला आहे. हाय लेव्हल क्रॅशवर्थनेस निश्चित कऱण्यासाठी यात अनेक बदल करण्यात आले आहेत. यात 70 हून अधिक सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. यात 6 एअरबॅग, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरमिक सनरुफ, 8 स्पीकर, वेंटिलेटेज फ्रंट सीट, 8-वे ऑपरेटेड ड्रायव्हर सीट, लेव्हल-2 ADAS सुट देण्यात आला आहे.
आवाजाने सुरू होणार कार
Hyundai CRETAने नवीन अँडव्हास व्हॉइस कमांड फिचरदेखील दिले आहे. यात 70हून अधिक ब्लूलिंक कनेक्टेड कार फिचर्स दिले जाणार आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यात 148 एम्बेडेड व्हॉइस कमांड दिले गेले आहेत. जे इंटरनेटविना ऑपरेट होऊ शकते. याशिवाय ही कार 62 हिंग्लिश (Hindi+English) व्हॉइस कमांडला सपोर्ट करते. उदा. अॅलेक्सा टर्न माय कार ऑन, अॅलेक्सा मेरी कार स्टार्ट करो. म्हणजेच तुम्ही एका आवाजाने तुमची नवीन क्रेटा स्टार्ट करु शकणार आहात.