ह्युंदाई लॉन्च करणार नवी सॅन्ट्रो, फिचर्ससोबतच नावही बदलणार!
प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई मोटर्सने नव्या वर्षात आपली हॅचबॅक कार सॅन्ट्रोचं नवं मॉडंल लॉन्च करण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई मोटर्सने नव्या वर्षात आपली हॅचबॅक कार सॅन्ट्रोचं नवं मॉडंल लॉन्च करण्याची शक्यता आहे.
छोट्या कारची वाढती मागणी
लहान कारची वाढती मागणी आणि व्यवसाय लक्षात घेऊन ह्युंदाई मोटर्स लहान कार्सवर फोकस करत असल्याचं बोललं जात आहे.
लॉन्चिंगपूर्वी कार रस्त्यावर
नव्या लॉन्चिंगसोबत ह्युंदाईच्या या लहानशा कारला AH2 नावाने ओळखलं जात आहे. मात्र, भारतीय बाजारात लॉन्चिंगनंतर या कारचं नाव सॅन्ट्रोच असणार आहे. गेल्यावर्षी या कारचं टेस्टिंग सुरु असताना दिल्लीतील रस्त्यावर पहायला मिळाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही कार पहायला मिळाली. ज्यावेळी ही कार रस्त्यावर पहायला मिळाली त्यावेळी ती पूर्णपणे कव्हर्ड होती.
अद्याप अधिकृत माहिती नाही
ह्युंदाईच्या या कारसंदर्भात कंपनीकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे या कारमध्ये कुठले फिचर्स असणार आहेत याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये.
२०१८मध्ये लॉन्चिंगची शक्यता
कारचा फोटो पाहून स्पष्ट आहे की, या कारचं प्रोडक्शन शेवटच्या टप्प्यात आहे. या गाडीला सॅन्ट्रो कारचं टॉप मॉडल मानलं जात आहे. भारतीय बाजारपेठेत ही कार २०१८मध्ये लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे.
या कारमध्ये रियल विंडशील्ड वायपरसोबतच ब्लॉक हेडलॅम्प आणि हाय माऊंडेट टेललॅम्प्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये १.१ लीटर iRDE इंजिन दिलं जाण्याची शक्यता आहे ज्याची क्षमता ६२hp असणार आहे. तर, काहींच्या मते या कारमध्ये १.२ लीटरचं पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे.
ऑटोमेटिक ट्रान्समिशन
ऑटोमेटिक ट्रान्समिशनची वाढती मागणी लक्षात घेता ह्युंदाईच्या या नव्या कारमध्ये ऑटोमेटिक ट्रान्समिशन सिस्टम (AMT) दिलं जाण्याची शक्यता आहे. ही कार फेब्रुवारी २०१८मध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपो दरम्यान सादर केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मे २०१८मध्ये बाजारपेठेत लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे.
ह्युंदाई सॅन्ट्रो कार १६ वर्षांपूर्वी बाजारात लॉन्च केली होती. सॅन्ट्रो कारच्या प्रचंड विक्रीनंतर ह्युंदाई देशातील दुसरी सर्वात मोठी कार निर्माता कंपनी बनली. या कारचा मुकाबला मारुतीच्या सिलेरियोसोबत असणार आहे.