How Delete MMS On Social Media Site Know About It: सोशल मीडिया दुधारी शस्त्र आहे असं म्हटलं जातं. या व्यासपीठावर चांगल्या वाईट दोन्ही बाबी घडत असतात. गेल्या काही दिवसात एमएमएस लीक (MMS Leak) होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे बदनामी भीतीने अनेकांनी टोकाचं पाऊल उचलल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे आता प्रश्न असा पडतो की लीक झालेले व्हिडीओ कसे डिलीट (MMS Delete) करता येतील? काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही पॉर्न साइट्स किंवा सोशल मीडिया वेबसाइट्सवर अपलोड केलेले व्हिडीओ किंवा फोटो डिलीट करू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वप्रथम कोणताही व्हिडिओ लीक झाल्यास स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. तक्रार नोंदवत असताना एका बाजूला थेट साइटच्या मालकाशी संपर्क साधून व्हिडीओ हटवण्याबाबत माहिती घेत राहा. बहुतेक वेबसाइट कॉपीराइट धोरणाचे पालन करतात. अशा परिस्थितीत ते लगेच पोस्ट काढून टाकतात, परंतु जर तुम्ही वेबसाइटच्या मालकाशी संपर्क साधू शकत नसाल तर तुम्ही थर्ड पार्टी वेबसाइट www.whois.com ची मदत घेऊ शकता. यामध्ये कोणत्याही साइटचे डोमेन नेम टाकल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती मिळते. यानंतर, तुम्ही साइट मालकाशी संपर्क साधू शकता आणि व्हिडीओ काढण्याची विनंती करू शकता.


Porn साइटवरून अशा पद्धतीने Video डिलीट करा


दुसरीकडे, जर व्हिडीओ पॉर्न साइटवर अपलोड केला गेला असेल तर तो काढून टाकणे आणखी सोपे आहे. कृपया लक्षात घ्या की व्हिडिओच्या तळाशी तक्रार करण्याचा पर्याय दिलेला आहे. यासोबत व्हिडीओ काढून का काढायचा. त्याची माहिती भरा आणि सबमिट करा. यासह, साइट मालक व्हिडिओ हटवतो.


स्मार्टफोनमधून MMS किंवा खासगी Video असे होतात लीक, अशी चूक तुम्ही करू नका


Google Search रिझल्टमधून डिलीट करा


तुमचा कोणताही आक्षेपार्ह व्हिडीओ किंवा फोटो चुकीच्या सर्च रिझल्टमध्ये दिसत असेल, तर तुम्ही तो काढून टाकू शकता. ते काढण्यासाठी तुम्हाला Google शी संपर्क साधावा लागेल. यासाठी तुम्हाला https://support.google.com/websearch/troubleshooter/3111061#ts=2889054%2C2889099%2C288910This  या साइटवर जावे लागेल.


जर तुमच्या नकळत ब्लॉगवर एखादा फोटो किंवा व्हिडीओ दिसत असेल तर गुगल तुम्हाला मदत करेल. यासाठी तुम्हाला https://support.google.com/blogger/contact/private_info वर जावे लागेल. त्याच वेळी, पोलीस देखील अशा परिस्थितीत आपल्याला मदत करतात.