मुंबई : VLC Media Player हा जगभरात वापरला जाणारा लोकप्रिय मीडिया प्लेयर आहे. आपल्याला व्हिडीओ चालवण्यासाठी या ऍपची गरज पडते. त्यामुळे बहुतेक लॅपटॉप, कंप्यूटर किंवा फोनमध्ये हा ऍप वापरला जातो. यामुळे कोणताही व्हिडीओ सहज पाहाता येणे शक्य होते. त्याची लोकप्रियता देखील जास्त आहे, कारण हे फ्री प्लॅटफॉर्म आहे, आणि वापरायला देखील सोपं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही देखील हा मीडिया प्लेयर वापरत असाल तर सावधान, कारण नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यानुसार या प्लॅटफॉर्मचा वापर करून हॅकर्स हेरगिरी करत असल्याचे सांगितलं गेलं आहे आणि बहुतेक डिवाईसमध्ये हा प्लॅफॉर्म असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना यापासून धोका आहे.


VLC Media Player च्या वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे


सिमेंटेक सायबर सिक्युरिटी युनिटच्या अहवालानुसार, चीनी सायबर गुन्हेगारी गट 'सिकाडा' व्हायरस पसरवण्यासाठी व्हीएलसी मीडिया प्लेयर वापरत आहे.


सिकाडा सरकार आणि इतर कंपन्यांची हेरगिरी करण्यासाठी विंडोज संगणक आणि लॅपटॉपवर या मीडिया प्लेयरचा वापर करून मालवेअर पसरवत आहे.


हॅकर्स तुमची हेरगिरी करत आहेत


अहवालानुसार, अनेक देशांना या मालवेअर हल्ल्याचा सामना करावा लागत आहे, ज्यामध्ये कॅनडा, अमेरिका, तुर्की, हाँगकाँग, मॉन्टेनेग्रो, इस्रायल, इटली आणि भारताची नावे आहेत. जर तुम्ही प्रश्न पडला असेल की VLC मीडिया प्लेयर हेरगिरी कशी करत असेल? तर आम्ही तुम्हाला यामागील सत्य सांगणार आहोत.


हा हॅकिंग ग्रुप या मीडिया प्लॅटफॉर्मची क्लीन व्हर्जन कॅप्चर करतो आणि त्याच्या मदतीने व्हायरस फाइल डिव्हाइसमध्ये टाकत आहे. सॉफ्टवेअरमध्ये मालवेअर फाइल टाकल्यानंतर, सिकाडा VNC रिमोट-ऍक्सेस सर्व्हरद्वारे सिस्टमचे संपूर्ण नियंत्रण घेते.


सुरक्षित राहण्यासाठी हे करा


हॅकिंग टाळण्यासाठी तुमचे सॉफ्टवेअर अपडेट ठेवा आणि तुमचे डिव्हाइस सुरक्षित ठेवण्यासाठी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर वापरा. तुमच्या महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घेतल्याची खात्री करा.


तसेच अज्ञात वेबसाइटवरील लिंकवर क्लिक करू नका. असे केल्याने तुमचे पैसे आणि महत्त्वाचा डेटा चोरीला जाण्याची शक्यता खूप वाढते.