मोबाईल Silent Modeवर ठेवून विसरलात, सापडत नाहीये? मग असा शोधा तुमचा स्मार्टफोन
मीटिंगमध्ये किंवा महत्वाच्या कामात असताना अनेक जण मोबाईल सायलेंट मोडवर (Silent Mode) ठेवतात.
मुंबई : मीटिंगमध्ये किंवा महत्वाच्या कामात असताना अनेक जण मोबाईल (Smartphone) सायलेंट मोडवर (Silent Mode) ठेवतात. काही जण झोपतानाही मोबाईल सायलेंटवर ठेवतात. पण अनेकदा मोबाईल सायलेंटवर ठेवल्यानंतर तो कुठे ठेवलेला हे आठवत नाही अन् मग अनेकांची गोची होती. त्यानंतर मोबाईलची शोधाशोध करता नाकी नऊ येतात. अनेकदा तर मोबाईल सापडतही नाही. मोबाईल सायलेंटवर असताना सापडत नसेल, तर तो अवघ्या काही मिनिटात कसा शोधायचा, हे आपण जाणून घेऊयात. (If you forget to put your Smartphone on silent mode how to find it know details)
Android Device Manager
सायलेंट मोडवर असलेला स्मार्टफोन Android Device Managerच्या मदतीने शोधता येऊ शकतो. यासाठी इंटरनेटं असायला हवं. यासाठी लॅपटॉप किंवा दुसऱ्या मोबाईलमधून जीमेल लॉगीन करावं लागेल. पण लॅपटॉप किंवा कॉम्प्यूटरमधून लॉगीन केल्यास मोबाईलचा शोध घेण्यास सोयीचं होईल. मोबाईलचा शोध कसा घ्यायचा हे स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात.
लॅपटॉपमध्ये जीमेल लॉगीन (Gmail Login) करा.
यानंतर गूगलवर Android Device Manager ओपन करा.
इथे मोबाईलचं करंट लोकेशन दिसेल.
लोकेशनच्या मदतीने मोबाईल कुठे आहे, हे समजेल.
प्ले साउंड (Play Sound), सिक्योर आणि इरेज डीव्हाईस असेल एकूण 3 पर्याय दिसतील.
प्ले साउंड या पर्यायावर क्लिक केल्यास मोबाईलची रिंगटोन वाजेल. त्यामुळे सायलेंट मोडवर असलेला मोबाईल तुम्हाला सहज सापडेल.
सिक्योर डीव्हाईसच्या मदतीने मोबाईल शोधण्यासाठी तुम्हाला त्या पर्यायात एक मेसेज लिहून दुसरा मोबाईल नंबर सेव्ह करावा लागेल. तुम्हाला, "कृपया मोबाईल परत करावा. तुम्हाला योग्य ते बक्षिस देण्यात येईल", असं मेसेज करता येईल.
हा मेसेज केल्यानंतर तुमचा मोबाईल हरवला असेल तो रिंग होईल. त्यानंतर ज्या कोणाचं लक्ष मोबाईलवर पडेल, त्या व्यक्तीला तो पाठवलेला मेसेज दिसेल. तसेच दुसऱ्या नंबरवर 'कॉल ऑनर' असा पर्यायही दिसेल. यावर क्लिक केल्यावर त्या मोबाईल नंबरवर कॉल येईल. या पर्यायाच्या मदतीने तुम्हाला मोबाईल मिळेल की नाही, हे पूर्णपणे तुमच्या नशिबावर आणि समोरच्या व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असेल.
Android Device Manager वापरताना या बाबी लक्षात ठेवा
मोबाईल सुरु असायला हवा
गूगलवर साईन इन केलेलं हवं.
मोबाईलमधील इंटरनेट सुरु असायला हवं किंवा वाय फाय कनेक्टेड हवं.
लोकेशन ऑन असायला हवं.