नवी दिल्ली : २०१८ हे वर्ष तंत्रज्ञान युगाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण म्हणून नोंदले जाणार आहे. कारण ५ जी नेटवर्क याच दरम्यान युजर्सच्या सेवेत येत असून यामध्ये डेटा खर्च होण्याचा मोठा बदलही पाहता येणार आहे. २०२३ मध्ये एकूण डेटा ट्रॅफिकच्या २० टक्के हा ५ जी आहे. सध्याच्या ट्रॅफिकचा विचार करता हे दिडपट जास्त आहे. यामध्ये ४ जी, ३जी आणि २ जी हे तिनही ट्रॅफिक असणार आहेत. स्वीडनचे दूरसंचार कंपनी एरिक्सनचे वरिष्ठ अधिकारी एरिक्सन यांनी यासंदर्भात माहिती दिली. ५ जी वापर हा ४ जी पेक्षा अधिक होईल अशी आशा व्यक्त केली जातेय. आगामी काळात नव्या फिचर्सचे स्मार्टफोनही येतील. त्यामुळे वर्चुअल रियॅलिटी (वीआर), अगमेंटेंड रियॅलिटी (एआर) आणि ४ के व्हिडिओ हे प्रमुख असतील. या टेक्निकल व्हिडिओं व्यतिरिक्त व्हिडिओच्या चारही बाजूस पाहण्याच्या दृष्टीने सक्षम बनविले जाईल.


५ जी ला सुरूवात 


एरिक्सन यांच्यामते २०२२ पासून ५ जी चा उपयोग सुरू होईल. भारतात मोबाइल डेटा ट्रॅफिक वाढून ५ पट होणार आहे. २०१७ मध्ये हे १.९ एक्सबाइट (ईबी), जे वाढून १० एक्साबाइट होईल.