मुंबई : आजकाल जगभरात आबालवृद्ध  इंटरनेटच्या जाळ्यात ओढले गेले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांना इंटरनेट नसेल तर अस्वस्थ वाटते. वायफाय, ब्रॉडबॅन्डशिवायदेखील लवकरच अत्यंत जलद गतीचे इंटरनेट उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या भारत सरकार अशा एका प्रोजेक्टवर काम करत आहे, ज्यामुळे तुम्हांला एलईडी बल्बद्वारा वेगवान स्पीडमध्ये इंटरनेट उपलब्ध होणार आहे. भारत सरकारच्या इन्फॉरमेशन अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी विभागातर्फे या प्रोजेक्टवर काम सुरू करण्यात आले आहे. या यंत्रणेला 'लाईफाई' असं नाव देण्यात आले आहे.  


 हाय क्ल्वालिटी व्हिडिओदेखील चालणार   


 सरकार करत असलेले प्रयत्न आणि टेस्टिंग यशस्वी ठरले तर वेगावान इंटरनेटमुळे हाय क्वालिटी व्हिडिओ, गाणी अवघ्या एका क्लिकवर सुरू होणार आहेत.  


 
 10 जीबी प्रति सेकंदाचा स्पीड 


टेस्टिंग यशस्वी ठरले तर एक किलोमीटरमध्ये 10 जीबी स्पीडने डाटा ट्रान्सफर होणार आहे. असा दावा करण्यात आला आहे. यामुळे लावकरच देशभरात काना कोपर्‍यात इंटरनेटची सुविधा पोहचणार आहे.  


IIT  मद्रास सोबत प्रोजेक्ट 


या प्रोजेक्टमध्ये आयआयटी मद्रास, एईडी बल्ब बनवणारी कंपनी 'फिलिप्स', इंडियन इन्स्टिस्ट्युट ऑफ सायन्स साहभागी झाले आहेत. वेगवान  इंटरनेटमुळे स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्टलाही चालना मिळणार आहे. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स त्यांच्या या प्रोजेक्टला लवकरच बंगळूरूमध्येही वापर करू इच्छित आहेत.  


गूगल आणि नासा करत आहे टेस्टिंग 


युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गनेदेखील लाईफाई टेक्निकवर काम  करायला सुरूवात केली आहे. त्यानंतर गूगल, नासा या टेक्निकला अधिक विकसित करायला मदत करत आहेत.