मुंबई : जर तुमचा पासवर्ड हॅक झाला असेल तर तुम्हाला Chromeचं plug-in कामात येईल. मॉर्डन वर्ल्डमध्ये तुमचा डेटा सुरक्षित ठेवणं आव्हानाचं असतं. कारण सायबर वर्ल्डमध्ये हॅकर्सची नजर तुमच्या पासवर्डवर नेहमी असते. त्यामुळे तुमचं पासवर्ड इतका मजबूत असला पाहिजे की हॅकरला देखील तुमचा पासवर्ड क्रॅक करणं सहज जमलं नाही पाहिजे. 2016 मध्ये एका व्यक्तीने दावा केला आहे की, त्याच्याकडे 272 मिलियन पासवर्ड आहेत. तो ते सोशल मीडियावर लाईक मिऴवण्यासाठी वापरु शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॅकर्सच्या तक्रारी सायबर क्राईमकडे लोकं करत नसल्याने हॅकर्सचा आत्मविश्वास जास्त वाढला आहे. जर तुमचा पासवर्ड मोठा असेल तर उत्तम. तुम्हाला असं वाटलं की तुमचं अकाऊंट कोणी वापरतंय तर लगेच पासवर्ड बदला. 


जर तुम्हाला माहिती करुन घ्यायचं असेल की तुमचं कोणतं अकाऊंट हॅक झालं आहे तर यासाठी एक उपाय आहे. Okta नावाची एक लॉग इन मॅनेजमेंट कंपनी आहे जी ही समस्य़ा सोडवते. ही आता ब्राउजर प्लग इनसोबत आली आहे.  PassProtect असं त्याचं नाव आहे. हे सांगेल की तुमचं अकाऊंट किती वेळा हॅक झाला आहे. 


सगळ्यात आधी ज्या वेबसाईटवर तुम्ही सर्वाधिक जाता त्या वेबसाईटवर जा. त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका आणि इंटर दाबा. त्यानंतर एक विंडो उघडेल. ज्यामध्ये असं दाखवलं की "जो पासवर्ड तुम्ही एंटर केला आहे तो 26 वेळा डेटा ब्रीचमध्ये वापरला गेला आहे. हा पासवर्ड वापरणं बंद करा." यानंतर तुमच्यावर आहे की तुम्ही हा पासवर्ड वापरायचा की नाही यानंतर तुम्हाला ही सूचना नाही मिळणार.