मुंबई : ग्रामीण भागात ग्राम पंचायत निवडणुकीत पैसे वाटप करून निवडून येणाऱ्यांवर, इंदुरीकर महाराजांनी ताशेरे ओढले आहेत. गावात बुद्धीमान लोक कसे निवडणूक हरतात, आणि ज्यांना ग्राम पंचायतीचा कारभार कळत नाही, ते कसे निवडतात, याचं जळजळीत सत्य इंदुरीकर यांनी मांडलं आहे. ग्राम पंचायत निवडणुकीत पैसे वाटप केल्यानंतर, सरपंचपद तर मिळतं पण आर्थिक स्थिती कशी वाईट होते, हे इंदुरीकर यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत मांडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तरूणांची पुढाऱ्यांच्या मागे फिरून काय स्थिती झाली आहे. तरूणांची व्यथा मांडण्यासाठी इंदुरीकरांनी सांगितलेल्या हिरोचं नाव 'पप्या' असल्याचं अख्ख्या महाराष्ट्राला आता माहित झालं आहे. 


इंदुरीकर यांनी तरूण बिअरबारमध्ये गेल्यानंतर कसे बोलतात, काय करतात, कॉलेजात गेल्यानंतर काय करतात, घरात तरूणाचा रूबाब कसा असतो. पण घरात तो पप्या पप्याच्या आईचा कसा लाडका असतो, ते इंदुरीकरांनी मांडलंय ते या व्हिडीओत तुम्हाला पाहायला मिळेल.