मुंबई : जर तुम्ही रिलायन्स जिओ सिम वापरत असाल, तर एकदा तुम्ही जिओ सिमचेआयडी तुम्ही पुन्हा एकदा तपासले पाहिजे. जिओमधील अनेक सेल्समॅन ग्राहक ग्राहकांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एका आयडीवरुन अनेकांना सर्व्हिस देत असल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी इंदोर पोलिसांकडे एक तक्रार आली आहे. पहिल्यापासून अॅक्टिवेट असलेली सिमकार्ड विकली जात असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
तुमच्या आयडीवर कोणते सिम कार्ड सुरू आहे याबद्दल आज आपण जाणून घेऊया.   हा प्रकार कशा प्रकारे तुम्ही कशाप्रकारे तपासू शकता त्याचीही माहिती घेणार आहोत. 


एकदा फिंगर प्रिंट आणि आधार आयडी घेतल्यानंतर आपल्या आयडीचा मल्टीपल उपयोग केला जात आहे.


एका आयडीवरून ५-६ सिम सुरू केले जात आहेत. एकच आयडी आणि फिंगर प्रिंटचा वापर कशा प्रकारे होतोय हा पोलीस तपासाचा विषय आहे.


तज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही जेव्हा ही सिम घ्यायला जाल तेव्हा आयडीवर स्पष्ट लिहा कि हा आयडी वन टाईम युजसाठी आहे. 


आयडीच्या फोटोकॉपीवर सिमचा IMEA नंबरही लिहा. प्रत्येक सिम कार्डच्या एन्व्हलपवर हा नंबर लिहिलेला असतो.  
सिमकार्ड कोणत्या कारणासाठी विकत घेताय ते त्यावर लिहा.


डॉक्यूमेंटचा कुठे गैरवापर झाला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही त्यावर लिहा. 


फिंगर प्रिंट आणि आधार कार्डच्या मदतीने सिम एक्टिव्हेट करत असाल तर ओळखीच्या व्यक्तीकडूनच अॅक्टिव्हेट करा. फिंगर प्रिंट देताना यात काही धोकाबाजी होणार नाही ना याची काळजी घ्या. 


रिलायन्स कंपनीच्या कस्टमर केअरवर फोन करुन तुमचा नंबर कोणी वापरत आहे का याची माहिती घेऊ शकता. आपल्या 'आधार'वर अॅक्टिवेट झालेल्या इतर सिमची माहितीही घेऊ शकता.
www.jio.com या वेबसाईटवर जाऊन 'माय अकाऊंट' ऑप्शनवर गेल्यास आपल्या 'आधार नंबर'वर अॅक्टिव्हेट सिमकार्डची माहिती मिळू शकते.


जिओच्या कस्टमर केअरला फोन करुन आधार कार्ड नंबर सांगितल्यास तुमच्या अकाऊंट संबंधित माहिती मिळू शकते. 


तुमचा आधार आयडी सोशल मीडियावर शेअर करु नका. अनोळखी व्यक्ती कडून सिमकार्ड अॅक्टिवेट करु नका.


जर तुम्ही ही सावधानता पाळली नाहीत तर तुमच्या सिम कार्डचा उपयोग समाजविघातक कामांसाठी केला जाऊ शकतो.