Wifi असं जिथे फक्त ३ सेकंदात होणार HD सिनेमा डाऊनलोड
डच रिसर्चच्या म्हणण्यानुसार एका नव्या वायरलेस नेटवर्कच्या मदतीनुसार वाय-फाय स्पीड ३०० पटीने अधिक फास्ट करू शकतो. या नेटवर्कमध्ये इन्फ्रारेड रेंजचा वापर करण्यात आला आहे.
मुंबई : डच रिसर्चच्या म्हणण्यानुसार एका नव्या वायरलेस नेटवर्कच्या मदतीनुसार वाय-फाय स्पीड ३०० पटीने अधिक फास्ट करू शकतो. या नेटवर्कमध्ये इन्फ्रारेड रेंजचा वापर करण्यात आला आहे.
एंडहोवेन युनिवर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रोफेसर टॉन कूननने सांगितलं की, आम्ही किरणांचा वापर वायरलेस पद्धतीने इन्फर्मेशन ट्रान्सफर करण्यासाठी करत आहोत. यामध्ये ही किरणं हाय कॅपेसिटी चॅनलप्रमाणे करत आहोत. एवढचं काय तर हे काम ऑप्टिकल फायबरप्रमाण देखील होत आहे. फक्त फायबरची गरज नाही. तसेच आता प्रत्येक सेंकदाला ११२ जीबी ट्रान्सफर करू शकत आहेत.
हा ३ फुल लेंथ एचडी सिनेमांप्रमाणे डेटा आहे. फक्त १ सेकंदात इथे डाऊनलोड करू शकतो. येथील लाइट एंटीना वेगवेगळ्या अँगल्सने इथे असलेल्या अनेक अदृष्य वेवलेंथ्यला रेडिएट करतात. जर एका युझरचा स्मार्टफोन किंवा टॅबलेटचा एंटीना साइटलाइनपासून दूर असेल तरी तो एकमेकांशी जोडला जातो. इन्फारेड वेवलेंथ तुमच्या डोळ्यात जातं नाहीत आणि त्यासाठीच ती सेफ आहे. एका सिस्टीमची मेंटिनेंस आणि पावर यूझची आपल्याला काळजी करावी लागत नाही. प्रत्येक युझरला त्याचं स्वतःची अशी एक एंटिना असते.
कूनन यांनी म्हटलं आहे की, या गोष्टीचे अनेक फायदे आहेत. युझरला इथे कॅपेसिटी शेअर करावी लागत नाही, प्रत्येकासाठी इथे वेगळी कॅपेसिटी असते. तसेच काही ट्रान्सफर करायचे असेल तर त्याकरता एक बीम मिळेल. आणि त्यासाठी जास्त पावर यूज देखील करावी लागणार नाही. त्याचा दुसरा फायदा असा आहे की, यामधील प्रकाश भिंत पार करू शकत नाही. म्हणजे तुमचं कम्युनिकेशन हे त्या खोलीपुरतं मर्यादित आहे. त्याबाहेर इतर कुणी हस्तक्षेप करू शकत नाही.