मुंबई : सर्व पालक आणि सोशल मीडिया प्रेमींसाठी चांगली बातमी आहे. सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुकच्या मालकीची कंपनी इन्स्टाग्राम येत्या काळात 13 वर्षाच्या मुलांसाठी स्वतंत्र इंस्टाग्राम ऍप तयार करत आहे.  या किड्स मेसेंजर  ऍपवर पालकांचे नियंत्रण असू शकणार आहे.(Facebook is building an instagram app for kids)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकने 2017 मध्ये 6-12 वयोगटातील मुलांसाठी मेसेंजर टॉक प्लॅटफॉर्म सुरू केले. इन्स्टाग्रामच्या वर्जनवर अद्याप काम सुरु असल्याचे प्रमुख एडम मोसेरी यांनी सांगितले. 'मुले पालकांना सतत विचारतात असे काही ऍप आहे की जे आम्ही वापरु शकू ? ज्याच्या मदतीने आमच्या फ्रेण्ड्सशी संपर्कात राहू ? यावर आता उत्तर सापडले असल्याचे मोसेरी यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे.


ते पुढे म्हणाले, "मेसेंजर किड्स प्रमाणेच इन्स्टाग्रामची ही आवृत्ती पालक नियंत्रित करु शकणार आहे. यावर आमचे काम सुरु आहे. आम्ही यासंबंधी अधिक माहिती येत्या काळात समोर आणू असे मोसेरी म्हणाले. मोसेरीचे उपाध्यक्ष पवनी देवानजीसमवेत इन्स्टाग्रामवर मुलांशी संबंधित हालचालींवर लक्ष ठेवून असतात.



टेक एक्सपर्ट फेसबुकने (Facebook) पुन्हा इंस्टाग्राम लाइट (Instagram Lite) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी फोटो शेअरिंग ऍपमध्ये बरीच नवीन वैशिष्ट्ये जोडली जात आहेत. 


या नवीन ऍपमध्ये काय खास ?


द व्हर्जच्या वृत्तानुसार, फेसबुकने आपल्या लोकप्रिय ऍप इंस्टाग्रामचे लाइट व्हर्जन इंस्टाग्राम लाइट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे भारतासह 170 देशांमध्ये पुन्हा सुरू केले जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्राम रील्सचादेखील यावेळी लाइट अ‍ॅपमध्ये समावेश असेल. तथापि, वापरकर्ते या अ‍ॅपवरून व्हिडिओ अपलोड करु शकणार नाहीत.


इन्स्टाग्राम लाइट केवळ अँड्रॉइड मोबाइल फोनसाठी पुन्हा लाँच केले जाईल. सध्या आयओएसमध्ये इंस्टाग्राम लाइट बाजारात आणण्याची कोणतीही योजना नाही असे अहवालात सांगितले गेले आहे.