मुंबई  : फोटो शेअर करण्यासाठी 'इंस्टाग्राम' हे अ‍ॅप दिवसेंदिवस खूपच लोकप्रिय आहे. या अ‍ॅपमध्ये आता लवकरच नवे अपडेट होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवळ फोटोंपुरता मर्यादित न राहता आता इंस्टाग्रामवर कॉलिंग आणि व्हिडिओसाठी खास सोय खुली करण्यात येणार आहे.  टेक क्रंचने दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्राम लवकरच डायरेक्ट मेसेजिंग सिस्टिममध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग लॉन्च करण्याची शक्यता आहे. याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.   


खास रिपोर्ट - 


जानेवारी 2018 मध्ये WAbetainfo ब्लॉगने इंस्टाग्राम कॉलिंग बटणची सोय देणार असल्याची माहिती दिली होती.   APKs मध्ये कॉलिंगचे बटण समाविष्ट करण्यात आले आहे मात्र हे बटण अजूनही कार्यान्वित करण्यात आलेले नाही. पण भविष्यात हे बटण सुरू केले जाईल ही शक्यता नाकारण्यातही येऊ शकत नाही.  



Giphy GIF चा ऑप्शन 


इंस्टाग्रामवर नुकताच Giphy GIF चा पर्याय देण्यात आला आहे. हा पर्याय APKमध्ये दाखवण्यात आला होता. आता यामध्ये कॉलिंग बटणही असल्याने लवकरच ते रोलआऊट होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.  


इंस्टाग्रामवर व्हिडिओ आणि ऑडिओचा ऑप्शन दिल्यानंतर स्नॅपचॅटपेक्षा ते अव्वल ठरण्याची शक्यता आहे.