Instagram New Feature : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) असलेल्या ‘इन्टाग्राम’ची (Instagram) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मेटाच्या मालकीचा असलेला हा प्लॅटफॉर्म या वर्षी युजर्ससाठी अनेक नवीन फिचर्स घेऊन (Social Media Platform) येत आहे. हे फीचर्स युजर्सना अधिक चांगला एक्सपिरियन्स देतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच हा प्लॅटफॉर्म अधिक युजर फ्रेंडली (User Friendly) आणि सुरक्षित देखील बनवतील. असं बोललं जातं की, जाणून घ्या इन्स्टाग्रामच्या या नव्या फिचर्सबाबत. (Instagram New Feature) 


इंस्टाग्राम वापरणे आणखी मजेदार बनणार आहे. कारण Meta Instagram लवकरच वापरकर्त्यांना इतर लोकांच्या post आणि reels पुन्हा post करण्याचा पर्याय देणार आहे. मेटा-मालकीच्या Instagram कंपनीने पुष्टी केली आहे की त्यांनी या वैशिष्ट्याची चाचणी सुरू केली आहे आणि ते लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी प्रसिद्ध केले जाईल. 


चाचणीचे काम सुरू आहे


रिपोर्टनुसार, कंपनी सध्या काही यूजर्ससोबत या नव्या फीचर वर काम करत आहे. विकसकांनी चाचणी पूर्ण केल्यानंतर Instagram येत्या काही महिन्यांत Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर प्रत्येकासाठी नवीन फीचर लाँच करण्यात येणार आहे. या फीचर अंतर्गत इंस्टाग्राम यूजरच्या प्रोफाईल सेक्शनवर टॅग ऑप्शनच्या पुढे रिपोस्ट फीचर उपलब्ध होणार आहे. 


आता फक्त स्टोरी शेअर करता येते


सोशल मीडिया अॅपच्या वैशिष्ट्यांचा मागोवा घेणारे अॅडम मोसेरी यांनी आधीच सांगितले होते की, Instagram आता फोटो-टू-व्हिडिओ प्लॅटफॉर्मकडे जाईल. इंस्‍टाग्राम वापरकर्त्यांना सध्या केवळ त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या स्‍टोरीमध्‍ये पोस्‍ट किंवा व्हिडिओ शेअर करण्‍याचा पर्याय मिळतो. जो 24 तासांनंतर आपोआप गायब होतो. परंतु नवीन रिपोस्ट फीचरनंतर हे होणार नाही. एकदा वापरकर्त्याने reels किंवा photo पुन्हा पोस्ट केल्यानंतर तो त्याच्या profile वर कायमचा पेज वर राहणार आहे. 


नवे फीचर असे काम करणार 


रिपोर्टनुसार, नवीन फीचर अंतर्गत तुम्हाला कोणत्याही Photo किंवा Video मध्ये  Share च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर, शेअर पर्यायामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत,जिथे तुम्हाला पुन्हा पोस्ट करण्याचा पर्याय दिसेल. तुम्ही एखादी पोस्ट पुन्हा पोस्ट करताच, ती तुमच्या प्रोफाइलमध्ये दिलेल्या रीपोस्ट टॅबमध्ये देखील दिसेल. एवढेच नाही तर जेव्हा तुम्ही एखादी पोस्ट रीपोस्ट कराल तेव्हा तुम्हाला त्यावर तुमचा कॅप्शन लिहिण्याचा पर्यायही असेल. हे फीचर ट्विटरचे रिट्विट सारखे फीचर आहे.