मुंबई : इंस्टाग्रामने पुन्हा एकदा एक नवीन अपडेट आणले आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप प्रमाणे आता इंस्टाग्रामवरही तुमचे लास्ट सीन दिसणार आहे.


 फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपवर खूप पूर्वीपासून


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे फिचर तुम्हाला न्यूज फीडमध्ये दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्राम मेसेजिंग सेक्शनमध्ये जावे लागेल. लास्ट सीन किंवा लास्ट अॅक्टिव्ह हे फिचर फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपवर खूप पूर्वीपासून होते. आता इंस्टाग्रामने ही हे फिचर सादर केले आहे. 


डी-अॅक्टीव्हेटचा पर्याय


इंस्टाग्राममध्ये लास्ट सीन हे फिचर तुम्हाला Show Activity Status नावाने मिळेल. ते डिफॉल्ट अॅक्टिव्ह असेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ते डी-अॅक्टीव्हेट करू शकता. पण तुम्ही जर तुमचे अॅक्टिव्हिटी स्टेटस ऑफ केल्यास तुम्हाला दुसरं कोणाचेही अॅक्टिव्हिटी स्टेटस दिसणार नाही. लवकरच हे फिचर अॅनरॉईन्ड आणि iOS साठी पूर्णपणे रिलीज करण्यात येईल.