१३ मेगापिक्सल कॅमेरा आणि अनब्रेकेबल डिस्प्लेचा फोन, किंमत केवळ ७,४९९
दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल निर्माता कंपन्या आपले नवे फोन्स बाजारात लॉन्च करत आहेत. त्याच क्रमाने इंटेक्स मोबाईलने आपले दोन नवे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.
नवी दिल्ली : दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल निर्माता कंपन्या आपले नवे फोन्स बाजारात लॉन्च करत आहेत. त्याच क्रमाने इंटेक्स मोबाईलने आपले दोन नवे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.
इंटेक्सने लॉन्च केलेले हे दोन्ही स्मार्टफोन्स बजेट फोन्स आहेत. तसेच हे फोन्स शटरप्रूफ आहेत. 'अॅक्वा लायंस' सीरिजचा विस्तार करत इंटेक्सने 'अॅक्वा लायंस एक्स १' आणि 'अॅक्वा लायंस एक्स १ प्लस' स्मार्टफोन नावाने दोन फोन्स लॉन्च केले आहेत.
अॅक्वा लायंस एक्स १ या फोनची किंमत ७,४९९ रुपये आहे तर अॅक्वा लायन्स एक्स १ प्लसची किंमत ८,४९९ रुपये आहे. या दोन्ही फोन्सची खास बाब म्हणजेच दोन्ही फोनमध्ये अनब्रेकेबल डिस्प्ले देण्यात आला आहे.
अनब्रेकेबल डिस्प्ले असलेल्या फोनचा फायदा असा आहे की, या फोनला एकदा स्क्रिन रिप्लेसमेंट वॉरंटी मिळणार आहे. ही वॉरंटी एका वर्षापर्यंत वैध राहणार आहे. कंपनीच्या संचालक निधी मार्केंडेय यांनी सांगितले की, यंदाच्या दिवाळीत आम्ही संपूर्ण पॅकेज घेऊन आलो आहोत. आम्हाला विश्वास आहे की, शटरप्रूफ सीरिज आमच्या ग्राहकांना खूपच आवडेल.
डिस्प्ले:
इंटेक्सच्या या दोन्ही फोन्समध्ये ५.२ इंच एचडी आयपीएस (७२०X१२८० पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. ४जी व्हिओएलटीई सपोर्टसह डिस्प्ले शटरप्रूफ आहे. अॅक्वा लायन्स एक्स १ प्लस आणि एक्स १ या दोन्ही फोन्सची जाडी ९ मिलीमीटर आहे.
प्रोसेसर:
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये १.३ गिगाहर्ट्जचं क्वॉड कोअर एममटीके ६७३७ प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी टी ७२०एमपी१ देण्यात आला आहे. इंटेक्स अॅक्वा एक्स १ प्लसमध्ये ३ जीबी रॅम आहे. तर लायन्स एक्स १ मध्ये २जीबी रॅम देण्यात आली आहे.
मेमरी:
इंटेक्स लायन्स एक्स १ प्लस फोनमध्ये ३२जीबी स्टोरेज तर इंटेक्स लायन्स एक्स १ फोनमध्ये १६जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. तर ही मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.
कॅमेरा:
जर तुम्ही फोटोग्राफी करण्याचे शौकीन आहात तर अॅक्वा लायन्स एक्स १ प्लस आणि अॅक्वा लायन्स एक्स १ हे दोन्ही फोन्स तुमच्यासाठी खास आहेत. दोन्ही फोन्समध्ये ड्युअल एलईडी फ्लॅश आणि अॅपरचर एफ/२.०च्या सोबत १३ मेगापिक्सल ऑटोफोकस रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी फ्लॅश आणि अपर्चर एफ/२.२ सोबत ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.