iPhone 12: आयफोन युझर्ससाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.  अ‍ॅपलने Apple ने iPhone 13 Mini चे उत्पादन कायमचे थांबवल्याची चर्चा सुरु होती. दरम्यान आता फ्रान्समध्ये आयफोन 12 ची विक्री तातडीने थांबविण्यात आली आहे. आयफोन 12 मॉडेलमध्ये  रेडिएशनची पातळी वाढल्याचे दिसून आले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे फ्रान्सच्या युजर्सकडून सध्याचे आयफोन अपडेटद्वारे दुरुस्त करण्यास किंवा देशात विकले गेलेले प्रत्येक आयफोन 12 परत घेण्यास देखील सांगण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रान्सपाठोपाठ बेल्जियमनेही आयफोन 12 मुळे आरोग्यास धोका असल्याचे म्हणत चिंता व्यक्त केली आहे. हँडसेटशी संबंधित संभाव्य जोखमी पाहून दूरसंचार नियामकाशी बोलणार असल्याचे बेल्जियमच्या डिजिटल मंत्र्यांनी सांगितले. दुसरीकडे जर्मनीच्या दूरसंचार नियामकानेही याबद्दल माहिती दिली आहे. आपण रेडिएशन चाचणी घेतली. फ्रेंच अहवाल पाहता डच कंपनीकडूनही स्पष्टीकरण मागवले जाईल, असे त्यांनी सांगितले. आयफोन 12 मॉडेल 2020 मध्ये आले होते. असे असले तरीही फ्रान्समधील iPhone 12 च्या किरणोत्सर्ग पातळीच्या विवादाबाबत  अ‍ॅपलच्या तंत्रज्ञान-सपोर्ट कर्मचार्‍यांनी याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.


आयफोन 12 मॉडेल युरोपियन युनियन मानकांपेक्षा जास्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करते, असा दावा करत फ्रान्सने Apple ला iPhone 12 ची विक्री थांबवण्यास सांगितले.  ग्राहकांनी याबाबत प्रश्न विचारले पण आम्हाला याबाबत कोणतीही माहिती नाही असे अ‍ॅपलचे कर्मचाऱ्यांनी सांगतात.


रेडिएशन पातळीमुळे कर्करोगाचा धोका कमी असल्याचे फ्रान्सचे डिजिटल मंत्री जीन-नोएल बॅरोट यांनी सांगितले. परंतु या घोषणेने मोबाइल फोन वापराच्या सुरक्षिततेबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. मोबाईल फोनच्या वापरामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो असे काही अभ्यासही समोर आले आहेत. मोबाइल फोनचे एक्सपोजर आणि शुक्राणूंची खराब गुणवत्ता यांचा अभ्यास 2014 मध्ये, एक्सेटर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी समोर आणला होता. फोन खिशात ठेवल्याने शुक्राणूंची संख्या आणि त्यांच्या हालचालींवर परिणाम होऊ शकतो असे ते म्हणाले, परंतु याबद्दल अधिक संशोधन आवश्यक असल्याचे त्यांनी मान्य केले.


वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने यापूर्वी मोबाईलद्वारे उत्सर्जित होणार्‍या रेडिएशनबद्दलची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. हे रेडिएशन मानवांसाठी हानिकारक आहे असे सूचित करणारा कोणताही पुरावा नसल्याचे त्यांनी सांगितले.1990 च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत बहुतेक लोक मोबाईल फोन वापरत नव्हते. त्यामुळे 20 वर्षांनंतरच्या सुरक्षिततेच्या जोखमींबद्दल फारच कमी माहिती असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. सध्या मोबाइल फोन वापरताना इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या संपर्कात येण्यामुळे आरोग्याच्या प्रतिकूल परिणामांशी संबंधित असल्याचा कोणताही सबळ पुरावा नाही, असे स्टॉकहोममधील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटमधील महामारीविज्ञानाच्या प्राध्यापक मारिया फेचटिंग यांनी सांगितले.  10 वर्षांमध्ये दररोज 17 मिनिटे मोबाईल फोन वापरल्याने कर्करोगाच्या गाठी होण्याचा धोका 60 टक्क्यांपर्यंत वाढतो, असा दावा 2020 मध्ये एका वेगळ्या अभ्यासातून करण्यात आला.