नवी दिल्ली : अॅपल्ल कंपनी आपल्या १० व्या वर्षपूर्तीनिमित्त ३ iPhone मार्केटमध्ये रात्री १० वाजता लाँच करणार आहे. iPhone 8, iPhone 8 Plus आणि iPhone x हे तिन्ही स्मार्टफोन आज स्टीव्ह जॉब्स ऑडिटोरियममध्ये लाँच केलं जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, टच आयडिया फिंगरप्रिंट स्कॅनरच्या जागी बायोमॅट्रिक स्कॅनर फेस आयडीपासून कमी असणार आहे. हे ३डी फेशिअल रिकग्निशन फिचर आपल्या चेहऱ्यांचे स्कॅन करू शकतं ज्यामुळे फोन अनलॉक होऊ शकतो.


प्रायव्हसीला सर्वात मोठा धोका 


काही लोकं या फिचरसाठी थोडेसे चिंतेत आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये प्रश्न विचारले गेले आहेत की, आयफोन ८मध्ये फोन युझर्सची बायोमॅट्रिक माहिती कशावरून चोरी केली जाणार नाही?  तिथेच दुसऱ्या बाजूला असं ही सांगितलं होतं की, आयफोन ८ चे हे फिचर कायम अॅक्टिव्ह असणार आहे. जेव्हा फोन लॉक मोडवर असेल तेव्हा ३ डी फेशिअल रिकग्निशन फिचर ऑन राहणार. अशावेळी हा आयफोन त्यांच्यासमोर जे घडत असेल ते रेकॉर्ड करेल. आता एक असा देखील प्रश्न आहे की, हॅकर फोन करून तुमच्या खाजगी जीवनात उलथा पालथ करू शकतात. 


अॅप्पलच्या iPhone मध्ये हे असणार फिचर्स 



आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस या दोन्ही फोनसोबत हा फोन लाँच केला जाईल. कंपनीचा हा सर्वात महागडा फोन असण्याची शक्यता आहे. या फोनची किंमत अमेरिकेत १००० डॉलर म्हणजे जवळपास ६३ हजार ७८५ रुपये (कर, सेस वगळून) असण्याची शक्यता आहे. आयफोन ८, आयफोन ८ प्लस आणि आयफोन X हे तीन फोन अॅपलच्या कार्यक्रमात लाँच होणार आहेत. 


आयफोन ८ मध्ये ४.७ इंच आकाराची, तर आयफोन ८ प्लसमध्ये ५.५ इंच आकाराची स्क्रीन असेल. या फोनला वायरलेस चार्जिंग आणि आयफोन ८ प्लस साठी ड्युअल रिअर कॅमेरा ही फीचर्स असण्याची शक्यता आहे.