मुंबई : अमेरिकेची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी अॅपलचा फोन तुम्हालाही भावला असेल... पण या फोनच्या इतर स्मार्टफोनच्या तुलनेत असणाऱ्या किंमतीमुळे मात्र तुम्ही हा फोन घेतला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. अॅपलचा स्मार्टफोन हा गुणवत्ता, डिझाईन आणि फिचर्ससाठी परिचित आहे. अॅपलचा नवा फोन कधी लॉन्च होतोय, याकडे या कंपनीचे चाहते वाट पाहत असतात. आता, अॅपलनं आपल्या एका स्मार्टफोनची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतलाय. हा स्मार्टफोन म्हणजे 'आयफोन ६ एस'...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होय 'आयफोन ६ एस'च्या किंमती घटवण्यात आल्यात. हा स्मार्टफोन आता केवळ ३५,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. लॉन्चिंगवेळी या फोनची किंमत ४०,००० रुपये निर्धारित करण्यात आली होती. आता यावर तब्बल ४००१ रुपयांची सूट मिळतेय. 


हा स्मार्टफोन विकत घेण्यासाठी तुम्ही फ्लिपकार्टवर बुक करू शकता. iOS 9 या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणारा या फोनमध्ये ३२ जीबी इंटरनल स्टोअरेज देण्यात आलंय. या फोनमध्ये ड्युअल टोन कलर एलईडी फ्लॅशसोबपत १२ मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर तर ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आलाय.